Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत नवा ट्विस्ट, भुवनेश्वरीसमोर येणार मितालीचं सत्य, अधिपतीला शिक्षा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 13:01 IST

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. शिवानी रांगोळे (Shivani Rangole), कविता मेढेकर (Kavita Medhekar) आणि हृषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. कविता लाड या 'भुवनेश्वरी' च्या भूमिकेत आहेत तर शिवानी ही अक्षराची भूमिका साकारत आहे.कविता लाड आणि विजय गोखले बऱ्याच काळानंतर डेलीसोपमध्ये दिसत आहेत. आता या मालिकेचे कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे.

झी मराठी वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक सप्ताहात हि मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. आत्ता पर्यंतच्या भागात अधिपती मितालीच्या बाबतीत अक्षराच्या बाजूने उभा राहिला आणि आता भुवनेश्वरी धनाजीला नोकरीवरून व घराबाहेर काढत असताना धनाजीच्या बाजूने उभा आहे.

 मितालीच्या बाबतीत जे खर आहे ते भुवनेश्वरीला कळणार आहे. अधिपतीचा हा पराक्रम ऐकून भुवनेश्वरीला राग अनावर होणार आहे. आता भुवनेश्वरी अधिपतीला शिक्षा करणार का? अधिपती आणि अक्षरा यांचं नातं कसं खुलत जाणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सगळ्यांची उत्तर आपल्याला मालिकेच्या आगामी भागातून मिळतील. 

टॅग्स :कविता लाडशिवानी रांगोळे