Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे' मालिकेची Wrap Up पार्टी, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:31 IST

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंगदेखील काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं आणि नुकतीच फेअरवेल पार्टीदेखील पार पडली. यावेळी या मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते. इतकेच नाही तर यावेळी सुबोध भावेने या मालिकेतील पात्रांचे व्यंगचित्र असलेली फ्रेम कलाकारांना भेट म्हणून दिली. फेअरवेल पार्टीचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिने तुला पाहते रे मालिकेत राजनंदिनी सरंजामेची भूमिका साकारली होती. तिने फेअरवल पार्टीचे फोटो शेअर करीत म्हटलं की, खूप छान प्रवास होता. 

तुला पाहते रे मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. त्यामुळे ही मालिका टीआरपीमध्ये देखील अव्वल होती. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे कळल्यापासून सर्व कलाकारांची आठवण येईल, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळते आहे.

तुला पाहते रे मालिकेत सध्या ईशा प्रेग्नेंट असल्याचं समजतं आणि ईशाला मारण्यासाठी झेंडेने माणसं पाठवली असतात. मात्र झेंडेंने पाठवलेल्या माणूस ईशावर गोळी झाडतो. पण ती गोळी विक्रांत स्वतः झेलतो.

त्यामुळे विक्रांतच्या हाताला गोळी लागली आहे. झेंडे विक्रांतला भेटण्यासाठी सरंजामे बंगल्यात येतो. तिथे त्याला विक्रांतला लांबून पहायला दिलं जातं.

आईसाहेब झेंडेशी नीट बोलत नाहीत आणि जयदीप झेंडेला धक्के मारत हकलून देतो.

विक्रांतला मागे केलेल्या सर्व चुकांचा पश्चाताप होताना पहायला मिळतं आहे. त्यामुळे या मालिकेचा शेवट चांगला होणार असल्याचं समजतं आहे. 

  

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठी