Join us
Daily Top 2Weekly Top 5

TRPच्या शर्यतीत 'माझ्या नवऱ्याची बायको'ची पिछेहाट, ही मालिका ठरली 'नंबर १'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:36 IST

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

ठळक मुद्देमालिकेतील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांना आवडत असून यंदाच्या आठवड्यात तुझ्यात जीव रंगला ही मालिका बार्कच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, तुझ्यात जीव रंगला ही मालिका गेल्या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर होती. पण या मालिकेत आलेला ट्विस्ट लोकांना चांगलाच आवडत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत हार्दिक जोशी आता राजा राजगोंडा ही भूमिका साकारत असून त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. मालिकेतील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांना आवडत असून यंदाच्या आठवड्यात तुझ्यात जीव रंगला ही मालिका बार्कच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण आता या मालिकेला तुझ्यात जीव रंगलाने मागे टाकले आहे.

तिसऱ्या क्रमांकावर चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न असून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पहिल्या पाचमध्ये देखील नव्हता. पण या आठवड्यात चला हवा येऊ द्याने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे असेच म्हणावे लागेल. 

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेने या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. ईशा विक्रांत सरंजामेचा बदला घेणार, त्याला शिक्षा देणार म्हणता म्हणता तिच्या मनात विक्रांतबद्दल हळूवार भावना निर्माण झाल्या होत्या. विक्रांतही ईशावर खरं प्रेम करायला लागला होता. त्यामुळे या मालिकेचा शेवट काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. त्यामुळे ही मालिका शेवटच्या आठवड्यात पाचव्या स्थानावर होती. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोतुझ्यात जीव रंगलास्वराज्य रक्षक संभाजीचला हवा येऊ द्यातुला पाहते रे