बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असतो. 'आशिकी ३' ( Aashiqui 3) या चित्रपटात तो दिसणार आहे. अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर, ॲनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. पण आता कथेत ट्विस्ट आला आहे.
मिड डेच्या रिपोर्ट्सनुसार, तृप्ती डिमरी आता या प्रोजेक्टचा भाग नाही. ती चित्रपटातून बाहेर पडली आहे. अनुराग बासू पूर्णपणे नवीन प्रेमकथा बनवण्याच्या तयारीत आहेत. मिड डेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तृप्ती या रोमँटिक चित्रपटात काम करण्यास उत्सुक होती. पण आता असे होणार नाही. आशिकी ३चे टायटल संबंधित वादातून जात आहे. त्यामुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
तृप्ती डिमरी पडली सिनेमातून बाहेर
तृप्ती डिमरीने गेल्या वर्षी या चित्रपटासाठी काही दिवस शूटिंग केल्याचे बोलले जात आहे. हा मुहूर्त शॉट असेल. तृप्ती डिमरी चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारणांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आशिकी ३ची घोषणा झाली तेव्हा बरीच चर्चा झाली होती. भूषण कुमार आणि मुकेश भट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मात्र निर्मात्यांमधील काही मतभेदांमुळे हे प्रकरण अजून पुढे गेलेले नाही. चित्रपटाच्या अपडेट्सबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तृप्ती डिमरीने कला, लैला मजनू, बुलबुलसारखे चित्रपट केले आहेत. ॲनिमल या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. ॲनिमलमध्ये ती छोट्या भूमिकेत होती. पण तिची भूमिका खूप आवडली. या चित्रपटात तृप्तीने बोल्ड सीन्स दिले होते. यानंतर ती बॅड न्यूज, विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, भूल भुलैया ३ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. आता ती धडक २ मध्ये दिसणार आहे.