Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या छातीला स्पर्श केला आणि बेडरुमपर्यंत..', लैंगिक अत्याचारावर शर्लिन चोप्राचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:38 IST

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने १४ एप्रिल रोजी एका व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपीने विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. मात्र अभिनेत्रीने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. आता याच अनुषंगाने शर्लिन चोप्राने पत्रकार परिषदही घेतली आणि तिने संपूर्ण घटना सांगितली.

शर्लिन चोप्राने सांगितले की ती १२ एप्रिल रोजी दुबईहून मुंबईत आली होती. मॅनेजरने तिला फोन करून सांगितले की एक गुंतवणूकदार तिला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. मॅनेजरने असेही सांगितले की गुंतवणूकदाराला माझ्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायची आहे. संध्याकाळी मुंबईतल्या एका स्टुडिओत हिप हॉप गाणे रेकॉर्ड करून घरी परतले. यानंतर संध्याकाळी मॅनेजर मला मुंबईतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला जिथे गुंतवणूकदार मला भेटण्यासाठी थांबले होते. सुनील पारसमणी लोढा असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

शर्लिनच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदाराने तिला पाहताच तिचे कौतुक करण्यास सुरुवात केली. तसेच तो तिचा मोठा फॅन असल्याचेही सांगितले. तसेच त्याला शर्लिनच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायची आहे. इतकेच नाही तर लोढा यांनी शर्लिनच्या मॅनेजरला सुरुवातीची छोटी रक्कमही दिली. यावर शर्लिनने व्यावसायिकाला सांगितले की ती इतक्या कमी पैशात म्युझिक व्हिडिओ बनवू शकत नाही. तिला किमान १५ ते २० लाख रुपयांची गरज आहे, जेणेकरून एक चांगला म्युझिक व्हिडिओ बनवता येईल.

शर्लिनने पत्रकार परिषदेत म्हटले की, लोढा यांनी मला ती टोकन मनी ठेवण्यास सांगितली आणि उर्वरित रक्कम खात्यात जमा करेन असे सांगितले. त्यावेळी दुपारचे १२.३० वाजले होते. त्याने मला सांगितले की त्याच्याकडे घरी जाण्यासाठी गाडी नसल्याने तिला घरी सोडण्याची विनंती केली. 'मग मी ड्रायव्हरला सांगितले की आधी मला घरी सोडा आणि मग त्यांना ड्रॉप करा. घरी पोहोचल्यानंतर सुनीलने माझे घर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मग मी त्यांना घरी बोलावले आणि खाण्यापिण्यासाठी विचारले. यावर तो शाकाहारी असल्याचे सांगितले. त्यानुसार मी त्याच्यासाठी शाकाहारी जेवण ऑर्डर केले. ते खाऊन झाल्यावर तो सोफ्यावर बसला आणि माझ्या छातीला स्पर्श करू लागला. यानंतर मी लगेच मागे हटले. मी त्याला सांगितले की मला हे सर्व आवडले नाही. यानंतर त्याने माफी मागितली. मी हॉट असल्यामुळे तो स्वत:ला थांबवू शकला नाही, असेही तो म्हणाला. मग मी त्याला म्हणाले की, 'हो मी हॉट आहे पण पब्लिक प्रॉपर्टी नाही.'शर्लिनने नंतर सुनीलला तिकडून निघून जायला सांगितले आणि त्याने स्वत:साठी कॅब बोलवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शर्लिन तिच्या बेडरूममध्ये गेली. यानंतर चार्जर मागण्याच्या बहाण्याने तोही तिच्या मागे गेला. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, 'त्याने पुन्हा एकदा माझ्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर मी थेट विचारले की माझ्याबद्दल तुम्हाला कोणी चुकीचे सांगितले आहे का? त्याने नकार दिल्यावर मी माझ्या मॅनेजरला २.३० वाजता फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. मग मी लोढा यांना सांगितले की या गोष्टी सोडवण्यासाठी सकाळी ग्रुप मीटिंग घेऊ. हे ऐकून तो भडकला.अभिनेत्रीने दावा केला की सुनीलने तिला सांगितले की त्याने शर्लिनच्या मॅनेजरला तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि म्युझिक व्हिडिओमध्ये गुंतवणूक न करण्यासाठी पैसे दिले आहेत. शर्लिनने सांगितले की, सुनीलने तिला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. अभिनेत्रीने आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३५४, ५०६, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
टॅग्स :शर्लिन चोप्रा