Join us

भारतीय सिनेमांनी लावलं पाकिस्तानी प्रेक्षकांना वेड; पाकमध्ये सुपरहिट ठरलेले Top 10 भारतीय Movies

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:03 IST

Bollywood movies: सध्या सोशल मीडियावर अशा टॉप १० वेबसीरिज आणि सिनेमांची चर्चा होतीये ज्या पाकिस्तानमध्ये तुफान लोकप्रिय झाल्या आहेत.  

भारतीय सिनेसृष्टीत कायम नवनवीन प्रयोग होत असतात. त्यामुळे अनेकदा नवीन धाटणीच्या, कथानकाच्या सिनेमा, वेबसीरिजची निर्मिती होतांना दिसते. त्यामुळे भारतीय कलाकृतींना जगभरात कायमच पसंती मिळते. मात्र, सध्या सोशल मीडियावर अशा टॉप १० वेबसीरिज आणि सिनेमांची चर्चा होतीये ज्या पाकिस्तानमध्ये तुफान लोकप्रिय झाल्या आहेत.  त्यामुळेच पाकिस्तानी प्रेक्षकांना वेड लावणारे हे सिनेमा आणि  वेबसीरिज कोणत्या ते जाणून घेऊयात.

१. लापता लेडीज-

किरण राव आणि आमिर खान यांच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत लापता लेडीज या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. यात गावात होणारा लग्नसोहळा आणि लोकांची मानसिकता यावर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. हा सिनेमा पाकिस्तानात हिट होतोय. 

२. शैतान -

अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला शैतान हा सिनेमा नुकताच रिलीज झाला.  सुपरनॅचरल थ्रिलर असलेला हा सिनेमा देशासह पाकिस्तानाही लोकप्रिय होत आहे.

३. अमर सिंह चमकीला- पंजाबचे पहिले रॉकस्टार अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

४. दंगे-अॅक्शन सीनचा भरणा असलेल्या या सीरिजमध्ये हर्षवर्धन राणे आणि अहान भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. २६ एप्रिल रोजी रिलीज झालेला हा सिनेमा पाकिस्तानमध्ये लोकप्रिय ठरत आहे. 

५. आर्टिकल 370-

फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने देशात बराच धुमाकूळ घातला होता. १९ एप्रिल रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला. यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पाकिस्तानमध्ये लोकप्रिय ठरला आहे.

६. डंकी-

या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुखने जोरदार कमबॅक केलं. अवैध पद्धतीने एका देशातून दुसऱ्या देशात कसा शिरकाव केला जातो यावर या सिनेमात भाष्य करण्यात आलं होतं. २१ डिसेंबरला रिलीज झालेला हा सिनेमा १५ फेब्रुवारीला ओटीटीवर स्ट्रीम करण्यात आला. 

७. animal-

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा देशात बराच गाजला. त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही तो लोकप्रिय झाला.

८. 12वीं फेल -

आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित 12 वी फेल या सिनेमात अभिनेता विक्रांत मेस्सी याने मुख्य भूमिका साकारली आहे.

९. हिरामंडी-

संजय लीला भन्साळी यांनी हिरामंडी या वेबसीरिजच्या माध्यमातून नुकतंच ओटीटीवर पदार्पण केलं आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजमध्ये पाकिस्तानमधील हिरामंडीवर भाष्य करण्यात आलं आहे. ही सीरिज सध्या बरीच गाजत आहे.

१०. मामला लीगल है -रविकिशन आणि यशपाल शर्मा यांची ही सीरिज सध्या लोकप्रिय होत आहे. कोर्टरुम ड्रामा असलेली ही सीरिज पाकिस्तानमध्येही प्रेक्षक आवडीने पाहात आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमावेबसीरिजपाकिस्तानसंजय लीला भन्साळी