शनिवारची सकाळ मीराबाई चानूने (Mirabai Chanu) गाजवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) या भारोत्तोलकने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्यपदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक जिंकून दिल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी मीराबाईवर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही मीराबाईला शुभेच्छा दिल्यात. अभिनेत्री टिस्का चोप्रा (Tisca Chopra) यापैकीच एक. पण हे काय,मीराबाईला शुभेच्छा दिल्यानंतर टिस्का ट्रोल होऊ लागली. टिस्कानं मीराबाईला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली. पण ही पोस्ट करताना चुकली. होय, मीराबाईच्या जागी तिनं इंडोनेशियाची वेटलिफ्टर आयशा विंडी कैंटिकाचा फोटो लावला. नेटक-यांनी तिची ही चूक लगेच पकडली आणि टिस्का ट्रोल झाली.
सौंदर्यात अनेक बड्या-बड्या अभिनेत्रींना मात देणा-या टिस्का चोप्राचे करिअरही फार खास चालले नाही. म्हणायला टिस्का दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये आहे. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आमिर खानच्या ‘तारें जमीं पर’ या चित्रपटातून टिस्काला ओळख मिळाली. यात तिने आईची भूमिका साकारली. मात्र आघाडीची अभिनेत्री बनण्याचे भाग्य तिच्या वाट्याला आले नाही. दिल तो बच्चा है जी, लव ब्रेकअप्स जिंदगी. अंकूर अरोरा मर्डर केस अशा चित्रपटांत ती दिसली. कहानी घर घर की, अस्तित्व- एक प्रेम कहानी अशा मालिकांमध्येही तिने काम केलेय.