Join us
Daily Top 2Weekly Top 5

TikTokला दुसरा मोठा झटका, 13 लाख फॉलोवर्स असलेल्या फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 18:04 IST

राष्ट्रीय महिला आयोगाकडे या व्हिडीओची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दिवसेंदिवस टिक-टॉकची लोकप्रियता कमी होत चालली आहे. आज प्ले स्टोअरमध्ये टिक टॉकचे रेटिंग 1.3 वर आले आहे. अनेकांनी हे अॅप डिलीच करायला सुरुवात केली आहे.  टिक टॉक स्टार फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे.  फैजलने त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत  तो एका मुलीवर पाणी (अ‍ॅसिड म्हणून) फेकतो. तू दुस-या मुलासाठी मला सोडले ना? असे तो मुलीला म्हणतो. यानंतर व्हिडीओतील मुलगी लाल मेकअपमध्ये दिसते. तिचा चेहरा अ‍ॅसिडने पोळलेला आहे हे दाखवण्यासाठी या लाल रंगाच्या मेकअपचा वापर केला आहे.  फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो नेटक-यांच्या निशाण्यावर आला होता. या घटनेनंतर ट्विटरवर ‘#BanTiktok’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. 

राष्ट्रीय महिला आयोगाकडे या व्हिडीओची तक्रार दाखल करण्यात आली होती.याची दखल घेत 13 फॉलोवर्स असलेले फैजलचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. तसेच टिकटॉककडून एक अधिकृत स्टेंटमेट जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी टिकटॉकच्या नियमानुसार कोणतीच अशा व्हिडीओ परवानगी देत नाही ज्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा महिलांवरील अत्याचाराचे समर्थन होईल. अशा प्रकाराचे व्हिडीओ टाकण्याची परवानगी टिकटॉक कधीच देत नाही. तसेच फैजलेवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.  

फैजल सिद्दीकी हा लोकप्रिय टिकटॉकर आमिर सिद्दीकीचा भाऊ आहे. अलीकडे आमिरने टिकटॉक युट्यूब पेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगत एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर युट्यूबर कॅरी मिनाटीने आमिरला रोस्ट केले होते. यावरून सोशल मीडियावर टिकटॉक विरूद्ध युट्यूब असे युद्ध रंगले होते. आमिर इतकाच त्याचा भाऊ फैजलही टिकटॉकवर लोकप्रिय आहे.

टॅग्स :टिक-टॉक