अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची ती हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमात दिसली होती. तसेच ती प्रेमाची गोष्ट या मालिकेतही मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळत होती. मात्र तिने अचानक या मालिकेतून एक्झिट घेतली. मग तिच्याजागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. तेजश्रीचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. त्यामुळे तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती आनंदी राहण्यासाठी मोलाचा सल्ला देताना दिसते आहे.
तेजश्री प्रधानने रेड एफएम ९३.५ एफएमला दिलेली जुनी मुलाखतीमधील एक रिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. यात तेजश्री प्रधान म्हणाली की, ''आज नाहीतर उद्या मला कायम असं वाटतं की खोट्या गोष्टींना कदाचित स्पीड असतो. पण खऱ्या गोष्टींना स्टॅमिना असतो. तर तो स्टॅमिना आपल्यामध्ये असणार आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि जग गोल आहे ना त्यामुळे इकडून जाणारी माणसं ही उद्या कुठल्या तरी प्रवासात माझ्यासमोर येणार आहेत. त्यामुळे इकडून ते लांब असताना त्यांना ओरडून आपली बाजू सांगण्यापेक्षा ते जेव्हा आपल्यासमोर येतील तेव्हा ते आपल्याला अनुभवतील. ''
''आनंदी राहा...!''
''आणि त्याच्यातून ते स्वतः एक जजमेंट घेतील, सो ते जजमेंट काय आहे हे डेफिनेटली ते त्यांच्या कुवतीप्रमाणे असणार. त्यामुळे ज्यांची कुवत आहे ते समजून घेतील आणि ज्यांची कुवत नाहीये त्यांच्या बाबतीत मला कुठला आटापिटा नाही करायचाय. तुम्हाला जे आपलं वाटतंय ते वाटून घ्या. आनंदी राहा. मी माझ्या आयुष्यात आनंदी राहणार आहे'', असे ती म्हणाली.