Join us
Daily Top 2Weekly Top 5

थॉरनं का ठेवलं आपल्या मुलीचं नाव इंडिया, क्रिस हेम्सवर्थनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:41 IST

थॉरच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ मेन इन ब्लॅक या चित्रपटात दिसणार आहे.

थॉरच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ मेन इन ब्लॅक या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिस फक्त त्याच्या चित्रपटामुळे नाही तर आणखीन एका कारणामुळे चर्चेत आहे. याचे कारण आहे त्याच्या मुलीचे नाव. खरंतर क्रिसच्या मुलीचं नाव इंडिया आहे. तिच्या नावामुळे सध्या क्रिस चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रिसने मुलीचे नाव इंडिया ठेवण्यामागचा खुलासा केलाय.

आईएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत क्रिसने त्याच्या मुलीचे नाव इंडिया ठेवण्यामागचे कारण त्याची पत्नी एल्सा पातकी सांगितले. तो म्हणाला की, माझ्या पत्नीने बराच कालावधी भारतात व्यतित केला आहे आणि त्याच कारणामुळे मी माझ्या मुलीचे नाव इंडिया ठेवलंय.

मुलाखतीत क्रिसने पुढे सांगितले की, फक्त माझी पत्नीच नाही मलादेखील भारत देश आवडतो. शूट करण्याचा अनुभव थोडे भयावह होता पण मजेशीर होता. मला शूटदरम्यान रॉकस्टारसारखे फील झाले.मागील वर्षी नेटफ्लिक्सचा प्रोजेक्ट ढाकाच्या चित्रीकरणासाठी क्रिस भारतात आला होता. त्यावेळी अहमदाबाद व मुंबईत चित्रीकरण केले होते.

क्रिसने सांगितले की, दिग्दर्शकाने कट म्हटले की चाहते जोराजोरात चीअर्स करायचे ते मला खूप आवडले.

बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, काही बातचीत सुरू आहे. कदाचित काम करेन. 

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेम