Join us

पतीच्या बोल्ड सीन्सवर अमृता खानविलकरची अशी होती रिअ‍ॅक्शन, खुद्द हिमांशू मल्होत्राचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 18:13 IST

Amruta Khanvilkar And Himanshu Malhotra : हिमांशू मल्होत्रा मौका या धोका’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ही सीरिज ड्रामा सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सीरिजमध्ये हिमांशूने बोल्ड आणि किसिंग सीन्स दिले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)चा नवरा देखील हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचं नाव हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra ) आहे. अमृता आणि हिमांशू नेहमी चर्चेत येत असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. एकमेकांच्या कामांचं ते नेहमीच कौतुक करत असतात. दरम्यान आता हिमांशू मल्होत्राच्या नव्या वेबसीरिजमधील बोल्ड सीन्सवर अमृताची प्रतिक्रिया कशी होती हे त्याने सांगितले आहे.

हिमांशू मल्होत्रा मौका या धोका’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ही सीरिज ड्रामा सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सीरिजमध्ये हिमांशूने बोल्ड आणि किसिंग सीन्स दिले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर अमृताची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा हिमांशूने केला आहे.  ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत हिमांशू म्हणाला की, मौका या धोखाृ या सीरिजची झलक पाहिल्यावर अमृता मला म्हणाली होती की, मी काहीतरी नवीन करतो आहे. नवनवीन भूमिका कराव्यात असे प्रत्येक कलाकाराला वाटते. तुम्ही आधीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे. या सीरिजचा ट्रेलर पाहून अमृता मला म्हणाली, मी खूप छान दिसतो आहे. जेव्हा तुमची बायको तुमचे कौतुक करते तेव्हा ते खास असते.

सर्वात आधी पोस्टर पाहिलं आणि मग...तो पुढे म्हणाला की, बोल्ड सीन्सबद्दल तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिने सर्वात आधी पोस्टर पाहिलं आणि मग ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहून ती जोर जोरात हसू लागली. तिला माहित आहे की हे आमचं काम आहे. ती सुद्धा एक अभिनेत्री आहे आणि त्यामुळे या गोष्टी चांगल्या समजतात.

टॅग्स :अमृता खानविलकर