Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांच्या दुकानात साफसफाई करायची 'ही' अभिनेत्री; शाहरुखमुळे बदललं नशीब, आज आहे १७० कोटींची मालकीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 12:36 IST

Actress: ही अभिनेत्री पाकिस्तानमध्येही कमालीची लोकप्रिय आहे.

कलाविश्वात आज असे असंख्य कलाकार पाहायला मिळतात ज्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात काही कलाकार असेही आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अनेक लहानमोठी काम केली. कोणी लोकांच्या घरी धुणीभांडी केली, कोणी गाडी पुसायचं काम केलं तर कोणी दुकांनांध्ये सेल्सचंही काम केलं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी दुकानामुळे झाडू मारायचं काम केलं होतं.मात्र, शाहरुख सोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर तिचं नशीब पालटून गेलं.

सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीचा जुना फोटो व्हायरल होत आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीने सुरुवातीच्या काळात अनेक खस्ता खाल्ल्या. बराच संघर्ष केला. मात्र, शाहरुखसोबत काम करायची तिला संधी मिळाली आणि रातोरात तिचं नशीब पालटलं. आजही अभिनेत्री लोकप्रिय अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. इतकंच नाही तर तिची एकूण संपत्ती सुद्धा १७० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.

फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माहिरा खान आहे. मूळ पाकिस्तानी असलेल्या या अभिनेत्रीने भारतातही प्रचंड लोकप्रियता मिळवली. अलिकडेच तिने लग्नगाठ बांधली त्यामुळे ती सध्या चर्चेत येत आहे. यात तिची स्ट्रगल स्टोरीही पुन्हा चर्चेत आली. माहिराने शाहरुख खानसोबत 'रईस' या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमानंतर ती भारतातही प्रचंड लोकप्रिय झाली.परंतु, सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती एका  रेस्टॉरंटमध्ये काम करत होती.  इतकंच नाही तर तिने कपड्यांच्याही दुकानात काम केलं होतं. इथे साफसफाई करण्यापासून ते कॅश काऊंटर सांभाळेपर्यंत तिने अनेक कामं केली.

दरम्यान, माहिरा इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कॅलिफॉर्नियामध्ये शिक्षणासाठी गेली होती. इथेही स्वखर्चासाठी ती लहानमोठ्या दुकानांमध्ये काम करत होती. आज माहिरा पाकिस्तानची सर्वात श्रीमंत आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती लहानातील लहान प्रोजेक्टसाठीही मोठी रक्कम आकारते. तिचं स्वत:चा  M By Mahira Khan या नावाने कपड्यांचा ब्रँड आहे. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त ती अन्य व्यवायांमधूनही कमाई करते. त्यामुळे आजच्या घडीला तिची एकूण संपत्ती १७० कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :माहिरा खानशाहरुख खानबॉलिवूडसिनेमा