Join us

'अली बाबा' मालिकेत तुनिषा शर्माच्या जागी लागली या अभिनेत्रीची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:25 IST

Tunisha Sharma : दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्मा अली बाबा या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत होती. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाल्याचे समजते आहे.

'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' (Alibaba Dastaan E Kabul) या वादग्रस्त मालिकेत लवकरच मरियमची एंट्री होणार आहे. शोची मुख्य नायिका तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिच्या जागी अभिनेत्री मनुल चुडासामाला साईन करण्यात आले आहे. मालिकेत प्रवेश करताना, मनुलने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

गेल्या वर्षी २०२२ मध्ये २४ डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्माने शोच्या सेटवरच आत्महत्या केली होती. या प्रकरणी सहकलाकार अभिनेता शिजान खान अद्याप तुरुंगात आहे. अली बाबा शोमध्ये शिजान खानच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक निगम आला असला तरी आता मरियमसाठी मनुल चुडासमाचे नाव फायनल झाले आहे.

मनुल चुडासामाने शोचे शूटिंग सुरू केले आहे. या मालिकेत मरियमचे पात्र साकारताना ती म्हणाली, मुख्य भूमिका म्हणून हा माझा चौथा शो आहे, त्यामुळे कोणतीही काळजी नाही, त्याऐवजी, मी या मालिकेचा एक भाग होण्यासाठी खूप उत्साही आहे. मी आधीच या मालिकेचा एक भाग आहे. मी एक भाग बनले आहे. शूटिंग सुरू झाले आहे.

यापूर्वी मनुल 'ब्रिज के गोपाल' आणि 'तेनाली रामा' सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये दिसली आहे. या अभिनेत्रीला तिच्या लूक आणि अभिनयामुळे टीव्हीवर प्रचंड लोकप्रियता मिळाली.

टॅग्स :तुनिशा शर्मा