Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ अभिनेत्रींचा डेब्यू चित्रपट हिट; नंतर इंडस्ट्रीतून झाल्या गायब!

By अबोली कुलकर्णी | Updated: December 18, 2018 18:54 IST

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे डेब्यू चित्रपट हिट झाले मात्र, नंतर काही त्यांची चित्रपटांची गाडी रूळावर धावलीच नाही. त्या अभिनेत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाल्या.

अबोली कुलकर्णी 

 फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सर्व कलाकारांना डेब्यू चित्रपट कसा रिस्पॉन्स मिळवतो याची काळजी असते, जर डेब्यू चित्रपट हिट झाला तर मात्र पुढचे चित्रपट कसा रिस्पॉन्स मिळवतात याकडे सर्व लक्ष लागून असते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे डेब्यू चित्रपट हिट झाले मात्र, नंतर काही त्यांची चित्रपटांची गाडी रूळावर धावलीच नाही. त्या अभिनेत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाल्या. चला तर मग घेऊयात अशाच काही उत्कृष्ट अभिनेत्रींचा आढावा...

* गायत्री सिंह :‘स्वदेस’ या हिंदी चित्रपटातून  शाहरूख खानसोबत गायत्री सिंह हिने डेब्यू कला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. मात्र, त्यानंतर गायत्रीने दुसरा चित्रपट केलाच नाही. त्यापेक्षा तिने लग्न करून घेतले. अशातच ती हृतिक रोशनची पत्नी सुझैन खान हिच्यासोबत लॉस एंजलिसमध्ये फिरताना दिसली. त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

* ग्रेसी सिंह :बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करण्याची संधी पहिल्याच चित्रपटावेळी ग्रेसी सिंहला मिळाली. त्यावेळी चित्रपटाबरोबरच ग्रेसी पण हिट झाली. त्यानंतर ती  २ -३ चित्रपटांत तर आली मात्र, ती फार काही कमाल दाखवू शकली नाही. आता अलीकडेच तिने छोटया पडद्यावर संतोषी मातेची भूमिका केली होती.

* संदली सिन्हा :‘तुम बिन’ या चित्रपटातून  डेब्यू करणाऱ्या संदली सिन्हाला तिच्या सौंदर्यासाठी ओळखले जात होते.                                                                      त्यांनी तुम बिन चित्रपटात काम केले पण, त्याशिवाय कुठलाही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर तिने या इंडस्ट्रीला कायमचे बाय बाय करून तिचे वेगळे विश्व तयार केले.

* प्रिती झांगियानी :‘मोहब्बतें’ चित्रपटातील तिन्ही अभिनेत्रींना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. परंतु, प्रिती झांगियानी ही अभिनय आणि सौंदर्य यांच्यामुळे चर्चेत होती. मात्र, यानंतर तिचा कुठलाही हिंदी चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार उल्लेखनीय काम करू शकला नाही. आता ती एका अ‍ॅवॉर्ड सोहळयात दिसली असता अतिशय सर्वसामान्य असल्यासारखीच दिसत होती.

* स्रेहा उलाल: ऐश्वर्या रॉय सारखी दिसणारी अभिनेत्री स्रेहा उलाल हिने सलमान खानसोबत ‘लकी’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. तिचे करिअर हिट होणार अशी खात्री प्रेक्षकांना या चित्रपटामुळे मिळाली होती. परंतु, असे झाले नाही. तिने त्यानंतर सलमानच्या भावासोबत ‘आर्यन’ हा चित्रपटही केला मात्र, तो चित्रपट फार काही कमाई करू शकला नाही. 

टॅग्स :ग्रेसी सिंगबॉलिवूड