Join us

'प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते'; कोल्हापुरला गेल्यावर असं का म्हणाला कुशल बद्रिके?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 17:47 IST

Kushal badrike: कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तो नवनवीन पोस्ट शेअर करत असतो.

लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो. समाजात किंवा त्यांच्या खासगी आयुष्यात कोणतीही घटना घडली की कुशल त्यावर पोस्ट शेअर करत व्यक्त होत असतो. अलिकडेच कुशलने त्याच्या पत्नीसोबत कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यातील काही फोटो शेअर करत त्याने एक छान पोस्ट लिहिली आहे.

कुशलने इन्स्टाग्रामवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील फोटो शेअर केला आहे. सोबतच बऱ्याच वर्षांनी देवीचं दर्शन घेण्याचा योग आला असंही सांगितलं. त्यामुळेच ही आठवण कायम स्मरणात रहावी यासाठी त्याने पत्नीसोबत महालक्ष्मी मंदिराच्या आवारात फोटो काढला.

"लग्नाला इतकी वर्ष झाली पण जोडीने कोल्हापूरच्या अंबाबाईच दर्शन घेता आलं नाही. अखेर आज योग जुळून आला. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते हेच खरं," असं कॅप्शन देत कुशलने फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, कुशल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. कुशलने पांडू, जत्रा, बायोस्कोप, बकुळा नामदेव घोटाळे, फ्रेंडशीप डॉट कॉम, भाऊचा धक्का यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

टॅग्स :कुशल बद्रिकेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारकोल्हापूर