Join us  

प्रतीक्षा संपली! ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय ड्रीम गर्ल 2

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:05 PM

ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकतेच त्याचा ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटातील आयुष्मान खुराना याच्या अभिनयाचे काैतुक सर्वत्र झालं. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.OTT प्लॅटफॉर्मवर चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. तर प्रतिक्षा संपली आहे. आता ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

ड्रीम गर्ल 2 चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. नेटफ्लिक्स याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आणि त्याची ओटीटी रिलीज डेटही जाहीर केली आहे. याबाबतची अपडेट शेअर करताना,  नेटफ्लिक्सने पोस्टमध्ये कॅप्शन दिलं, ''“तुमची सर्व स्वप्ने साकार होणार आहे. कारण, ड्रीम गर्ल येतेयं ! ड्रीम गर्ल 2 आता उद्यापासून नेटफ्लिक्सवर!''

'ड्रीम गर्ल 2' हा 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचा दुसरा भाग आहे.  'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामध्ये आयुष्माननं पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. आयुष्मान खुरानाबरोबरच ‘ड्रीम गर्ल २’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूडसिनेमाड्रिम गर्ल