Join us

'पत्र जिवंत करणारा आवाज हरवलाय...'; 'चला हवा येऊ द्या शो'मध्ये पोस्टमन काकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना हवाय सागर कारंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:29 IST

Sagar Karande : सागर कारंडे अनेक दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये नसल्यामुळे त्याची उणीव प्रेक्षकांना भासत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)ने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. श्रेया बुगडे, भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे या कलाकारांनी या शोमध्ये धमाल आणून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. अनके शोमध्ये देखील ही मंडळी खळखळून हसवण्याचा काम करतात. जर एखादा नवीन प्रोजेक्ट या कलाकारांना करायचा असेल तर शोमधून ब्रेक घेऊन ही कलाकार मंडळी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. त्यामुळे काही काळासाठी ते हा शो सोडताना दिसतात. शो सोबतच चित्रपट, नाटक या माध्यमातून त्यांचा हा प्रवास अविरतपणे चालू असतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सागर कारंडे (Sagar Karande) या शोमधून बाजूला झालेला असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले आहे. त्याची उणीव प्रेक्षकांना भासते आहे.

सागर कारंडे अनेक दिवसांपासून चला हवा येऊ द्या शोमध्ये नसल्यामुळे त्याची उणीव प्रेक्षकांना भासत आहे. त्यात भर म्हणून की काय सागर कारंडेची जागा श्रेया बुगडेने घेतली असल्याने प्रेक्षकांनी या शोला चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या या शोने आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल घडवून आणले. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात प्रसिद्ध पत्रकारांच्या समोर श्रेयाने पत्र वाचण्याचे धाडस केले. पण सागर कारंडेच्या आवाजात बोलण्याच्या पद्धतीत जी जादू आहे ती श्रेयाकडे नसल्याचे दिसून येते. 

काही दिवसांपूर्वी बुगडे हिने गृहिणींच्या मनातला ठाव घेणारे पत्र वाचून दाखवले. पत्रातला मजकूर प्रेक्षकांना नक्कीच आवडला असला तरी ते श्रेया बुगडेने वाचल्याने प्रेक्षकांनी यावर नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली. हे पत्र वाचवून दाखवण्याचे सेगमेंट सागर कारंडे यांच्याकडे असते. पोस्टमन काका ही वेगळी छाप सागर कारंडे याने प्रेक्षकांच्या मनात बनवली आहे. त्यामुळे श्रेयाला या भूमिकेत स्वीकारणे प्रेक्षकांना थोडेसे जड गेले. तू या भूमिकेसाठी योग्य नाही ही सागर कारंडेची जबाबदारी आहे आणि आम्हाला या जागी दुसरा कोणीही नकोय अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी देण्यास सुरुवात केली. सागर कारंडे या शोचा अविभाज्य घटक बनला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तो या शोमध्ये दिसत नाही. त्याला परत बोलवा अशी मागणी प्रेक्षकांनी करण्यास सुरुवात केली आहे. सागरची पत्र वाचण्याची विशिष्ट पद्धत प्रेक्षकांना नेहमीच भावुक करून जाते. त्यामुळे त्या आवाजाची मजा काही वेगळीच आहे. तू या भूमिकेत योग्य वाटत नाहीस असे श्रेया विरुद्ध मत मांडले जात आहे.

टॅग्स :चला हवा येऊ द्याश्रेया बुगडे