बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या लोकप्रिय सिनेमांसाठी ओळखली जाते, परंतु अर्जुन कपूरसोबतचा तिचा 'द लेडी किलर' (The Lady Killer) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ ३८,००० रुपयांची कमाई केली होती, ज्याची चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा झाली. आता या अपयशावर भूमीने पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले असून चित्रपटाबद्दल खंत व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत भूमीने स्पष्ट केले की, चित्रपटाचे अपयश हे केवळ कथेमुळे नव्हते, तर चित्रपट ज्या पद्धतीने प्रदर्शित झाला त्यामध्ये तांत्रिक चुका होत्या. भूमी म्हणाली, "आम्ही या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले होते, पण चित्रपट पूर्णपणे तयार नव्हता. चित्रपटाचा बराचसा भाग शूट व्हायचा बाकी होता आणि कथा पूर्ण होण्याआधीच तो चित्रपटगृहात आला."
भूमीने यावेळी सह-कलाकार अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक अजय बहल यांना मात्र पाठिंबा दिला. तिने सांगितले की, हे अपयश कोणा एका व्यक्तीमुळे नसून परिस्थितीमुळे आले होते. "एक कलाकार म्हणून जेव्हा तुमचा चित्रपट अशा प्रकारे फ्लॉप होतो, तेव्हा नक्कीच वाईट वाटते. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही एका वेगळ्या विषयावर काम करण्याचा प्रयत्न केला होता,"
४५ कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या 'द लेडी किलर'ने बॉक्स ऑफिसवर केवळ १ लाखांची कमाई केली. चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण नसणे आणि अनेक प्रसंग अर्धवट दिसणे, ही या अपयशाची प्रमुख कारणे मानली जातात. अनेकांनी याला 'बॉलीवूडचा सर्वात मोठा फ्लॉप' असेही संबोधले होते.
भूमी पेडणेकरने पुढे सांगितले की, ती आता अशा अपयशातून धडा शिकून पुढे जात आहे. ती सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत असून, आशयघन सिनेमांना तिची पहिली पसंती कायम असेल. भूमीच्या या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे, कारण सहसा कलाकार आपल्या फ्लॉप चित्रपटांबद्दल उघडपणे बोलणे टाळतात.
Web Summary : Bhumi Pednekar addressed 'The Lady Killer's' failure, citing incomplete production and technical issues, despite a significant budget. She supports her colleagues and focuses on future projects, learning from the experience.
Web Summary : भूमि पेडनेकर ने 'द लेडी किलर' की विफलता पर बात की, बड़े बजट के बावजूद अधूरे निर्माण और तकनीकी समस्याओं का हवाला दिया। उन्होंने अपने सहयोगियों का समर्थन किया और अनुभव से सीखते हुए भविष्य की परियोजनाओं पर ध्यान केंद्रित किया।