Join us

गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवज्योत सिंग सिद्धूंची पुन्हा कपिल शर्माच्या शोमध्ये एन्ट्री, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:38 IST

हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन ३ लवकरच

 The Great Indian Kapil Show Season 3:  कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ( The Great Indian Kapil Show Season 3) तिसरा सीझन येत्या २१ जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. या नव्या सीझनमधील एक प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण, या प्रोमोत नवज्योत सिंग सिद्धू यांची धमाकेदार एन्ट्री पाहून  चाहते खुश झालेत.

नेटफ्लिक्सच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये कपिल हा अर्चना यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो. त्यावर अर्चना विचारते, "कपिल कुठं घेऊन जातो आहेस?" तेव्हा कपिल सांगतो की दोन सीझन हिट दिल्याबद्दल नेटफ्लिक्स तुम्हाला सरप्राईज देत आहे. यावर अर्चना यांना वाटतं की त्यांना गाडी किंवा घर भेट मिळणार आहे. पण, कपिल जेव्हा डोळ्यावरची पट्टी काढतो तेव्हा समोर असतात नवज्योत सिंग सिद्धू. त्यांना पाहून अर्चना यांना धक्काच बसतो. त्या विचारतात "ते खरंच आहेत की मी स्वप्नात आहे?". हा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. 

कपिल, अर्चना आणि नवज्योत सिंग सिद्धू या तिघांना एकाच फ्रेमध्ये पाहून चाहते आनंदी झालेत. नवज्योत सिंग सिद्धू यांची एन्ट्री झाल्यानं हा सीझन धमाकेदार असणार यात शंका नाही. या सीझनमध्ये कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोवरही दिसणार आहेत. खरंतर नवज्योत सिंग सिद्धू हे २०१९ पासून कपिल शर्मा शोपासून दूर होते. त्यांनी यामागे काही राजकीय आणि काही वैयक्तिक कारणे असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूकपिल शर्मा नेटफ्लिक्सअर्चना पूरण सिंग