Join us

सलमानचा 'सिकंदर' सिनेमा कसा वाटला? भाईजानचे वडील सलीम खान म्हणाले- "तुम्ही जर प्रेक्षकांची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:59 IST

Sikandar First Review: सलमानचा 'सिकंदर' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू थेट भाईजानचे बाबा सलीन खान यांनीच दिला आहे. सिनेमा थिएटरला पाहण्याच्या आधी नक्की वाचा (sikandar)

सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाची (sikandar movie) सर्वांना उत्सुकता आहे. टीझर, ट्रेलर आणि गाण्यांपासूनच 'सिकंदर' सिनेमा पाहायला सलमानचे चाहते आगाऊ बुकींग करुन स्वतःची सीट थिएटरमध्ये राखून ठेवत आहे. दोनच दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 'सिकंदर' नावाचं वादळ येईल यात शंका नाही. अशातच सलमानचा (salman khan) 'सिकंदर' सिनेमा भाईजानचे बाबा सलीम खान (salim khan) यांना कसा वाटला, याविषयीची माहिती समोर येतेय. लेकाचा 'सिकंदर' पाहून सलीम खान यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

'सिकंदर' सिनेमाविषयी सलीम खान म्हणाले

सलीम खान यांनी 'सिकंदर' पाहून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. सलीम खान म्हणतात की, "मला सिनेमा खूप आवडला. या सिनेमाची विशेष गोष्ट ही आहे की, प्रत्येक सीननंतर पुढे काय होईल, याचा अंदाज प्रेक्षक बांधताना दिसतो. याशिवाय सिनेमातील व्यक्तिरेखा पुढे काय करतील, याचेही आडाखे प्रेक्षकांच्या मनात सुरु असतात. तुम्ही जर शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता चाळवत असाल, तर तिथे सिनेमा जिंकताना दिसतो." अशाप्रकारे 'सिकंदर' सलमानचे बाबा सलीम खान यांना आवडलेला दिसतोय.

सलमान खानने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, सिकंदरमधील दोन संवाद हे बाबांच्या 'दीवार' सिनेमावर आधारीत आहेत. "फेंके हुए पैसे नहीं उठाता:", "आप हमे बाहर ढूंढ रहे हो हम आपके घर में आपका इंतजार कर रहे हैं", हे 'सिकंदर'मधील संवाद 'दीवार' सिनेमातील मूळ संवादांमध्ये थोडे फेरफार करुन वापरण्यात आले आहेत. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 'सिकंदर' सिनेमा ३० मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाबॉलिवूड