अभिनेता आणि नेता थलपती विजय(Thalapathy Vijay)चा शेवटचा चित्रपट 'थलपती ६९'च्या निर्मात्यांनी टायटलसह फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये अभिनेता गर्दीमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. एच.विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला असून या चित्रपटाचे नाव 'जन नायगन' (Jana Nayagana) ठेवण्यात आले.
निर्मात्यांनी केवीएन प्रॉडक्शनच्या अधिकृत X हँडलवर विजय थलपतीच्या बहुप्रतिक्षीत सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच, निर्मात्यांनी पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आम्ही याला जन नायगन, थलपथी 69 फर्स्ट लूक म्हणत आहोत.'' 'जन नायगन'च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये थलपती विजय एका उंच स्टेजवर आत्मविश्वासाने उभा राहून समर्थकांच्या गर्दीसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. हे पोस्टर त्याच्या सपोटर्ससाठी एक विशेष कनेक्शन म्हणून पाहिले जाऊ शकते.
सिनेमाच्या नावाचा आहे हा अर्थथलपती विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी पारंपारिक पूजा समारंभाने सुरू झाले होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या X हँडलवर कलाकार आणि क्रू मेंबर्ससह अनेक फोटो शेअर केली होती. सुपरस्टार थलपती विजयच्या शेवटच्या चित्रपटाच्या नावाचा अर्थ लोकांचा नायक असा आहे.
पूजेला हे कलाकारही होते उपस्थित पारंपारिक पूजा समारंभात थलपती विजय, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि पूजा हेगडे आणि इतर कलाकार आणि क्रू सदस्य उपस्थित होते. या चित्रपटाचे शूटिंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाले होते.
हे स्टार्स दिसणार थलपतीसोबतथलपती विजय 'जन नायगन'मध्ये अभिनेत्री पूजा हेगडेसोबत पडद्यावर आदिसणार आहे. थलपती विजयच्या चित्रपटात पूजा हेगडेसह बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण, प्रियमणी, ममिता बैजू, मोनिशा ब्लेसी आणि वरलक्ष्मी सरथकुमार यांच्यासह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थलपती विजयचा 'जन नायगन' सिनेमा १७ ऑक्टोबर रोजी तमिळ, तेलुगू तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.