Join us  

Ravi Tejaच्या 'टायगर नागेस्वरा राव'चा फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 4:17 PM

Ravi Teja : रवी तेजाच्या मोस्ट अवेटेड पॅन इंडिया चित्रपट 'टायगर नागेस्वरा राव'चा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे.

क्रॅक अँड किक फेम रवी तेजा (Ravi Teja) हा तेलुगूमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट 'टायगर नागेस्वरा राव' (Tiger Nageswara Rao) द्वारे रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज लाँच करण्यात आला आहे. निर्मात्यांनी आयकॉनिक हॅवलॉक ब्रिज येथे चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉन्च केला. द काश्मीर फाइल्स आणि कार्तिकेय 2 चे निर्माते अभिषेक अग्रवाल या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या अॅक्शन ड्रामामध्ये गायत्री भारद्वाज आणि नुपूर सनॉन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

रवी तेजाचा फर्स्ट लूक आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला, जो खूप पसंत केला जात आहे. या फर्स्ट लूक पोस्टमध्ये रवी तेजा वाघासारखा गर्जना करताना दिसत आहे. त्याच्या डोळ्यात विस्मय आणि चेहऱ्यावर राग आहे. निर्मात्यांनी रवी तेजाला India's biggest thief म्हटले आहे. सध्या या अभिनेत्याच्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. वामसी दिग्दर्शित पिरियड फिल्म कुख्यात चोर टायगर नागेस्वर राव यांच्या जीवनावर आधारित आहे. हा ड्रामा १९७०च्या दशकावर आधारीत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टीझरला बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आपला आवाज दिला आहे. अलीकडेच, चित्रपटाचे निर्माते, अभिषेक अग्रवाल यांनी ते व्हिडिओ आर्ट्सच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केला होता. व्हिडिओमध्ये जॉन चित्रपटाच्या टीझरचा व्हॉईसओव्हर करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिषेकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम टायगर नागेस्वर रावला त्याच्याच आवाजात हिंदीत सादर करणार आहे. २४ मे रोजी पहिली झलक."

टायगर नागेस्वर राव व्यतिरिक्त चित्रपटात प्रवीण दाचाराम, रेणू देसाई, मांडवा साई कुमार आणि राजीव कुमार अनेजा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. जीव्ही प्रकाश कुमार यांनी चित्रपटाचे संगीत सांभाळले आहे तर आर मढी आयएससी सिनेमॅटोग्राफी विभाग सांभाळत आहेत. अविनाश कोल्ला हे प्रोडक्शन डिझायनर आणि श्रीकांत विसा संवाद लेखक आहेत. हा चित्रपट २० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात ५ सुपरस्टार, तेलगूमधील व्यंकटेश, कन्नडमधील शिवा राजकुमार, हिंदीतील जॉन अब्राहम, तामिळमधील कार्थी आणि मल्याळममधील दुल्कर सलमान हे एकत्र येत आहेत आणि रवी तेजाला टायगर नागेस्वर रावच्या भूमिकेत सादर करत आहेत.

टॅग्स :जॉन अब्राहम