Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या लेकीची पहिली झलक आली समोर, अभिनेत्रीनं शेअर केला क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:05 IST

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच तिची मुलगी मालती मेरी हिचा एक फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई झाली होती. प्रियांकाने २०१८ साली हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्न केले. प्रियांका आणि निकची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा जन्म यावर्षी १५ जानेवारी रोजी सरोगसीद्वारे झाला. प्रियांका आई होण्याबद्दल चाहत्यांनाही खूप उत्सुकता होती. अभिनेत्री वेळोवेळी चाहत्यांना तिच्या मुलीची झलकही दाखवताना दिसत आहे. चाहत्यांना मालतीचा चेहरा अजून नीट पाहता आला नसला तरी तिच्या या फोटोला पसंती मिळताना दिसते आहे.

नुकतेच प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्रियांका चोप्रा आणि तिची बेस्ट फ्रेंड तमन्ना दत्तच्या डे आऊटचा आहे. फोटोमध्ये प्रियांका मुलगी मालतीसोबत दिसत आहे, तर तमन्नाही तिच्या मुलासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आमच्या मित्राला २२ वर्षे झाली आहेत आणि अजूनही मोजणी सुरू आहे... पण आता आमची मुले एकत्र आहेत... लव्ह यू तमन्ना दत्त."

प्रियांका चोप्राचे हे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांना खूप आवडत आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, हा फोटो खूपच क्यूट आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, मालती खूप सुंदरतेनं मोठी होत  आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री नुकतेच 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट यावर्षी १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका 'जी ले जरा' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास