Join us

Bipasha Basuच्या लेकीची पहिली झलक आली समोर, देवीवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 16:33 IST

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बासूने नुकतेच एका मुलीला जन्म दिला. नुकताच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून अभिनेत्रीने तिच्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू(Bipasha Basu)ने नुकतेच एका मुलीला जन्म दिला आहे. १२ नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना बिपाशाने लिहिले की, "देवी बासू सिंग ग्रोव्हर, आमच्या प्रेमाचे आणि आईच्या आशीर्वादाचे शारिरीक प्रतीरुप." अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता बिपाशा बासूला मुलीच्या जन्मानंतर ३ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासूला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. अभिनेत्रीने पती करण सिंग ग्रोव्हर आणि मुलीसह पॅप्ससाठी जोरदार पोझ देखील दिली. बिपाशाने गुलाबी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली मुलगी देवीला हातात पकडलेलं दिसत आहे. 

या फोटोमध्ये बिपाशाने ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड ड्रेस घातला आहे, तर करण सिंग ग्रोवरने ब्लॅक टी-शर्ट घातला होता. फोटोमध्ये अभिनेत्रीने डोळ्यांवर गॉगल आणि मास्क लावलेला दिसतो आहे. फोटोमध्ये बिपाशा तिच्या मुलीसोबत पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे.

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. 'अलोन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही स्टार्स प्रेमात पडले, बिपाशा आणि करणने एका वर्षाच्या डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. करण सिंग ग्रोव्हरने यावर्षी ऑगस्टमध्ये बिपाशा लवकरच आई-वडील होणार असल्याची घोषणा केली होती. करणच्या या घोषणेवर चाहत्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता.

 

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर