Join us

'तुला पाहते रे' फेम प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 13:12 IST

Sonal Pawar Wedding : अभिनेत्री सोनल पवार आज म्हणजेच २८ डिसेंबरला समीर पालुष्टेसोबत विवाहबद्ध झाली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतेच स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे-आकाश पंडीत यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्न केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे तुला पाहते रे फेम सोनल पवार (Sonal Pawar) . आज तिने समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री सोनल पवार आज म्हणजेच २८ डिसेंबरला समीर पालुष्टेसोबत विवाहबद्ध झाली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे. वधूच्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. नोव्हेंबरमध्ये या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना खुशखबर दिली होती. तसेच सोनलने हळदी, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कोण आहे सोनलचा नवरा?समीर पालुष्टे हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजिटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणून काम करतो. त्याला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 

वर्कफ्रंटबद्दल...सोनल पवारने तुला पाहते रे मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने रुपालीची भूमिका केली होती. याशिवाय तिने घाडगे अँड सून या मालिकेतही काम केले आहे. सध्या ती रमा - राघव मालिकेत झळकत आहे. यात तिने अश्विनीची भूमिका बजावली आहे. 

टॅग्स :तुला पाहते रे