Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत होणार चक्क निर्मात्यांची एन्ट्री! दिसणार झोनल ऑफिसरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 17:00 IST

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. त्याच आता मालिकेच्या निर्मात्यांची झोनल ऑफिसर म्हणून एंट्री होणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर  आल्याने धम्माल उडाली आहे. त्यातच आता मालिकेत झोनल ऑफिसर येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे झोनल ऑफिसरची भूमिका 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत.

 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...'  ही मालिका पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली गोष्ट आहे. मकरंद अनासपुरे साकारत असलेले गुळस्कर आणि समीर चौघुले यांनी साकारलेले निरगुडकर यांच्यातील या मालिकेतील चढाओढ प्रेक्षकांना आवडते आहे. गुळस्कर हे नवीन पोस्ट मास्तर झाल्याने त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आणि अशातच आता पोस्ट ऑफीसमध्ये कॉम्प्युटर येऊन दाखल झाले आहेत.

 पोस्ट ऑफीसमधील कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी, कॉम्प्युटरशी जुळवून घेता येईल का, हे पाहणं आता मजेशीर असणार आहे. पोस्ट ऑफीसचं कामकाज सुरळीत चालू आहे की नाही, हे बघण्यासाठी झोनल ऑफिसर येणार आहेत. मकरंद महाजनी असे या झोनल ऑफिसरचे नाव असून ही व्यक्तिरेखा  'पोस्ट ऑफीस उघडं आहे..' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत. झोनल ऑफिसर पोस्टात आल्यानंतर पोस्ट कर्मचाऱ्यांचा काय गोंधळ उडणार आहे, हे पाहणंही उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

टॅग्स :सोनी मराठी