Join us
Daily Top 2Weekly Top 5

१०१ टक्के ही हत्याच! सुशांत राजपूतच्या मृतदेहावर पोस्टमोर्टम करतेवेळी नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:00 IST

सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो असं रुपकुमार शाह यांनी म्हटलं.

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानं नवा खुलासा केला आहे. सुशांतच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खूणा होत्या. हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो, तुझं काम तू कर. माझं काम केवळ पोस्टमोर्टम करणं आणि मृतदेह शिवणे हेच होते. दीड दोन तास पोस्टमोर्टम झालं. त्याचं व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली असं कर्मचारी रुपकुमार शाह यांनी म्हटलं. 

रुपकुमार शाह यांनी सांगितले की, सुशांत सिंह हा खूप मोठा अभिनेता होता. त्याच्यासारख्या माणसाने आत्महत्या केल्यानं याकडे निरखून बघणं आमचं काम आहे. मी २८ वर्षात ५०-६० मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. मी वरिष्ठांना कळवलं. तेव्हा केवळ पोस्टमोर्टम करून द्या असं काम होतं ते करून दिले असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या मुलाखतीत शाह यांनी हा दावा केला आहे. 

मृत्यू संशयास्पद असल्याचं मृतदेहाच्या पोस्टमोर्टमवेळी व्हिडिओग्राफी केली जाते. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो. पोस्टमोर्टमवेळी २ महिला आणि ३ पुरुष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झालं होते. ही हत्या असल्याची चर्चा झाली. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमोर्टमचं काम करा. आम्ही अहवाल बनवतो असं डॉक्टरांनी म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही मृतदेहावर पोस्टमोर्टम केले. जे काही नमुने होते ते पोलिसांकडे सुपूर्द केले असं रुपकुमार शाह यांनी सांगितले. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यूला नवं वळण; कुपर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याचा मोठा दावा

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत या निरापराध जीवाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. १०१ टक्के ही आत्महत्या नसून हत्याच होती. तुम्ही सुशांतचा मृतदेह निरखून पाहिला तर हे दिसून येईल. प्रत्येक माणसाला स्वत:च्या जीवाची काळजी असते. आज माझं ६० वर्ष वय आहे. माझं कुटुंब आहे. माझाही मृतदेह तिथेच आला तर काय, मी आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत त्यामुळे मी पुढे येऊन बोलत आहे. मी नाव घेऊन सांगू शकत नाही. पण कुठलीही वाच्यता बाहेर करू नका असं मला सांगण्यात आले होते. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी मी पुढे आलोय असं रुपकुमार शाह यांनी सांगितले.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत