Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील या अभिनेत्रीनं वयाच्या १५ व्या वर्षी केलं अभिनयात पदार्पण, अजय देवगणसोबत दिलेत हिट सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:00 IST

फोटोत पांढऱ्या फ्रिल ड्रेसमध्ये दिसणारी ही हसतमुख मुलगी आज बॉलिवूडचं एक मोठं नाव आहे.

काही बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये अभिनेता संजय कपूरसोबत उभ्या असलेल्या या अभिनेत्रीची कथाही अशीच आहे. पांढऱ्या फ्रिल ड्रेसमधली ही हसतमुख मुलगी आज बॉलिवूडचं एक मोठं नाव आहे. पहिल्याच चित्रपटात अत्यंत गंभीर व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्रीने कॉमेडीपासून रोमान्सपर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट केले आणि यश मिळवले. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री तुम्ही ओळखू शकता का?

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री तब्बू आहे, जिचे पूर्ण नाव फार कमी लोकांना माहिती आहे. तब्बूचे पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असून ती मूळची हैदराबादची आहे. तब्बूने वयाच्या १५ व्या वर्षी देव आनंद यांच्यासोबत काम केले होते, या चित्रपटात तिने देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. देव आनंद यांनीच तिला तब्बू हे नाव दिले आणि त्यानंतर ती या नावाने ओळखली जाऊ लागली.

52 वर्षीय तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही. तिच्या जन्मानंतर तब्बूच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तिची आई रिजवाना शिक्षिका होत्या. तब्बू तिच्या आई आणि बहिणीसोबत फोटोत दिसत आहे.

तब्बूने तिच्या चित्रपट कारकिर्दीत विजयपथ, माचीस, साजन चले ससुराल, दृश्यम, विरासत, हेरा फेरी, भुलभुलैया 2, मकबूल असे अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनं जिंकली आहेत.

टॅग्स :तब्बूसेलिब्रिटी