Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कॅप्टन मार्व्हल' फेम अभिनेत्याचं वयाच्या ४९ व्या वर्षी गंभीर आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 12:15 IST

'कॅप्टन मार्व्हल्स' या सुपरहिरो सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालंय (Kenneth Mitchell))

'कॅप्टन मार्व्हल' फेम अभिनेता केनेथ मिशेलचं (Kenneth Mitchell) निधन झालंय. शनिवारी २४ फेब्रुवारी त्याचं निधन झालंय. वयाच्या ४९ व्या वर्षी केनेथ मिशेलने अखेरचा श्वास घेतला. केनेथने 'स्टार ट्रेक: डिस्कवरी' या सिनेमात काम केलंय. याशिवाय 'कॅप्टन मार्वल' मध्ये त्याने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. केनेथच्या कुटुंबाने ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली. केनेथ गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आजाराचा सामना करत होता. 

केनेथ अलेक्झांडर मिशेलचा जन्म २५ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. कॅनडामधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून केनेथची ओळख होती. २०१७ साली आलेल्या 'स्टार ट्रेक: डिस्कवरी' या सिनेमात केनेथने बहुरंगी भूमिका साकारल्या. 'स्टार ट्रेक' सिनेमाच्या संपूर्ण टीमने केनेथच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. केनेथला ALS (Amyotrophic lateral sclerosis) आजार झाला होता. या आजारात रक्तवाहिनी आणि मेंदूवर परिणाम होतो.

ALS सारख्या गंभीर आजाराचा सामना करत असूनही केनेथ आनंदी होता. त्याने आजारपणाचा परिणाम इतरांवर होऊ दिला नाही. त्याने आयुष्यभर सर्वांना प्रेम अन् पाठिंबा दिला, अशा भावना केनेथच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या. केनेथच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

 

टॅग्स :हॉलिवूड