Join us
Daily Top 2Weekly Top 5

मला मुली आवडत नाहीत... असं म्हणत श्रद्धा कपूरला या अभिनेत्याने केलं होतं रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 14:24 IST

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नुकताच 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)चा नुकताच 'स्त्री २' (Stree 2) चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या अभिनेत्री चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करत आहे. श्रद्धाचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. इतकंच नाही तर तरूणांची ती क्रश असणं सामान्य बाब आहे. मात्र तुम्हाला माहित्येय का, अभिनेत्रीचा बालपणापासून बॉलिवूडचा एक अभिनेता क्रश होता. तिने या अभिनेत्यासोबत हिट चित्रपटही दिले आहेत. एवढंच नाही तर त्या दोघांनी एकमेकांच्या सिनेमात केमिओदेखील केला आहे. हा अभिनेता म्हणजे वरूण धवन (Varun Dhawan). 

इंडिया डॉट कॉमने प्रदर्शित केलेल्या वृत्तात अभिनेत्री म्हणाली, ही खूप जुनी गोष्ट आहे. हे लोकांना माहीत आहे. वरुणने माझा प्रस्ताव नाकारला होता. ते खूप मजेशीर होते. आम्ही आमच्या वडिलांच्या शूटिंगला गेलो होतो. माझ्या लहानपणी वरुणवर माझा थोडे क्रश होते. आम्ही डोंगराच्या माथ्यावर गेलो. तिथे खेळत होतो. तेव्हा मी म्हणाले, वरुण, मी एक गोष्ट सांगेन, मी उलट बोलेन, तर तू त्याचा अर्थ समजून जा. मी म्हणाले, यू लव्ह आय. त्यावर वरूण म्हणाला की, मला मुली आवडत नाहीत आणि तो पळून गेला.

दोघांनी या सिनेमात एकत्र केले कामवरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी एबीसीडी २ आणि स्ट्रीट डान्सर थ्रीडी सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी एकमेकांच्या भेडिया आणि स्त्री २ या चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील दिले आहेत, जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.

वर्कफ्रंटश्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती स्त्री २मुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाने फक्त ५ दिवसात जगभरातून ३०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. देशभरात या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट ५० कोटीत बनला आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरवरूण धवन