Join us

"...म्हणून आम्ही मूल होऊ दिलं नाही", प्रार्थना बेहरेने सांगितलं आई न होण्यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:12 IST

Prarthana Behere : प्रार्थना बेहरे हिने नुकतेच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. शेवटची प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने साकारलेली नेहा रसिकांना खूपच भावली. प्रार्थना सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ती चाहत्यांना देत असते. नुकतेच प्रार्थनाने एका मुलाखतीत मुंबई सोडल्याचे सांगितले. तसेच तिने मूल होऊ न दिल्यामागचे कारणही सांगितले.

प्रार्थना बेहरे सतत चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ते कधी आगामी प्रोजेक्टमुळे. नुकतेच प्रार्थना बेहरे हिने सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने तिच्या मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर भाष्य केले. ती म्हणाली की, कायमच मला मूल नको होते. त्याऐवजी मला खूप पेट्स हवे होते. जेव्हा माझे अभीसोबत लग्न ठरले तेव्हा त्याचीही हीच इच्छा असल्याचे मला कळले. आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि आता आम्ही आमच्या या मुलांची काळजी घेतो. तसेच यासाठी आमच्या कुटूंबाचा पूर्ण पाठींबा होता.

अलिबागला कायमचं शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलाया मुलाखतीत तिला मुंबई सोडून अलिबागला जाण्याचा निर्णय का घेतला असे विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, अलिबागमध्ये आमची जागा खूप पूर्वीपासून होती. माझ्या नवऱ्याच्या अभिच्या आजोबांची होती. कोविडच्या दोन वर्षं आधी आम्ही ठरवले की ती जागा विकसित करूया. त्यानंतर रो-रो बोट सुरु झाली. तिथे घोडे, कुत्रे असे प्राणी पाळले आहेत. त्यामुळे अभिला आठवड्यातून चार दिवस तिथे जावे लागत होते. मी तेव्हा जुहूला राहायचे. माझी त्यावेळी मालिका सुरु होती. त्यामुळे मला इथेच राहावे लागत होते. त्यामुळे आम्ही तिथेच शिफ्ट व्हायचे ठरविले. पण, त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मजा नाही. 

आम्हाला आता एक वर्ष पूर्ण होईलमुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू-सासरे सुद्धा तयार झाले. त्या वातावरणात त्यांचे आयुष्य आणखी वाढले आहे असे मला वाटते. ते दोघे सुद्धा तिथे सुखी आहेत. तिथे मी मेकअपशिवाय फिरू शकते, झाडांची काळजी घेते. माझी पेंटिग्जची आवड जपते. प्रवासाच्या दृष्टीने थोडा त्रास झाला. पण आता सवय झाली आहे. आता काहीच वाटत नाही. आम्हाला आता एक वर्ष पूर्ण होईल.

टॅग्स :प्रार्थना बेहरे