Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठरलं तर मग' फेम साक्षीचा पतीसोबत रोमँटिक फोटो, त्यांच्या 5 वर्षांच्या गोंडस लेकीला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:15 IST

केतकी प्रचंड फीट असून तिच्या योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत.

टेलिव्हिजनवर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. मालिकेतील सायली अर्जुनची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. तसंच यातील इतरही कलाकार लोकप्रिय झाले आहेत. त्यातच एक साक्षी शिखरेची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालव (Ketki Palav). केतकीची मालिकेत उशिरा एन्ट्री झाली. तिच्याआधी अभिनेत्री मीरा ही भूमिका साकारत होती. मात्र तिने मालिका सोडल्यानंतर केतकीने ही भूमिका निभावली. केतकीलाही प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं. नुकतंच केतकीने नवऱ्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री केतकी पालव काही वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. अनेक मालिकांमध्ये तिने सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. सध्या 'ठरलं तर मग' मधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. केतकीचा नवरा गंधार पटवर्धनचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने केतकीने त्याच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केलाय. 'माझ्या सर्वात आवडत्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेरे लिये तुम काफी हो' असं छानसं कॅप्शनही तिने लिहिलं आहे. 

केतकी आणि गंधार यांना 5 वर्षांची मुलगीही आहे. केतकी अनेकदा मुलीसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर केतकी आणि गंधर्व लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला 7 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. 2019 साली तिने लेकीला जन्म दिला. तिचं नाव ईश्वरी असं ठेवण्यात आलं.

केतकी प्रचंड फीट असून तिच्या योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. सध्या केतकी मालिकेशिवाय 'आमने सामने' हे नाटकही करत आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडियापरिवारटेलिव्हिजन