Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर ग्लास अन् जमाल कुडूवर डान्स, जुईचा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:42 IST

जुईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसत आहे.

'ठरलं तर मग' मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. या मालिकेत जुई साकारत असलेली सायली प्रेक्षकांना भावते. जुईचा चाहता वर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही जुई चाहत्यांना देत असते. नुकतंच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

जुईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आज वर्ल्ड डान्स डे निमित्त जुईने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसत आहे. डोक्यावर ज्यूसचा ग्लास ठेवून जुई जमाल कुडू गाण्यावर डान्स करत आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेतीलच हा एक भाग आहे. हा व्हिडिओ शेअर करत जुई म्हणते, "कोणी बघत नाहीये असा डान्स करा, हॅपी वर्ल्ड डान्स डे". तिच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'पुढचं पाऊल' या मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये जुई झळकली. ती टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. पण, मध्यंतरी गंभीर आजारामुळे जुईने अभिनयातून ब्रेक घेतला होता.  

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार