Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर १० वर्षांनी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

By कोमल खांबे | Updated: March 17, 2025 18:02 IST

काही महिन्यांपूर्वीच मोनिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेत अर्जुनची बहीण अस्मिताचं पात्र साकारून अभिनेत्री मोनिका दबडे घराघरात पोहोचली. काही महिन्यांपूर्वीच मोनिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

मोनिकाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी १५ मार्च रोजी मोनिकाने गोंडस लेकीला जन्म दिला. लेकीबरोबरचा पहिला फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. "दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो...गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो...आणि नवे पर्व सुरु ...15.03.2025", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मोनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 'ठरलं तर मग'च्या सेटवर मोनिकाचं बेबी शॉवरही करण्यात आलं होतं. गरोदर राहिल्यानंतर काही महिन्यांनी मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता अभिनेत्री तिचं आईपण एन्जॉय करत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीसेलिब्रिटी