Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणणार्‍या ट्रोलर्सला टेरेंसने ऐकवली साधूची कथा; नोरा म्हणाली, थँक्स

By रूपाली मुधोळकर | Updated: September 28, 2020 18:08 IST

शेअर केला नोरासोबतचा रोमॅन्टिक फोटो

ठळक मुद्देव्हिडीओत दिसते त्यानुसार, याचदरम्यान टेरेंसने नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करतो. नोरा यावर काहीही रिअ‍ॅक्ट करत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा एक व्हिडीओ कालपासून प्रचंड व्हायरल होतोय. केवळ व्हायरल नाही तर या व्हिडीओ पाहून नेटकरी टेरेंसला ट्रोल करत आहेत. या व्हिडीओत कथितरित्या टेरेंस नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसतो. आता या वादग्रस्त व्हिडीओवर टेरेंस आणि नोराची प्रतिक्रिया आली आहे. टेरेंसने यावर थेटपणे बोलणे टाळले़ पण नोरासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो त्याने शेअर केला. सोबत एक कथाही ऐकवली, यावर नोरानेही कमेंट केली आहे.

टेरेंसने सांगितली साधू व स्त्री कथा...

नोराचा फोटो शेअर करत टेरेंसने ट्रोल करणा-यांना उत्तर दिले. या फोटोत टेरेंसने नोराला हातांवर उचलले आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने एक कथा लिहिली आहे. एकदा एक साधू एका स्त्रीला नदी पार करण्यासाठी मदत करतो. तो साधू त्या स्त्रीला हातावर उचलून नदी पार करवतो.  हे पाहून एक शिष्य साधूला प्रश्न विचारतो. तुमच्यासाठी स्त्रीस्पर्श सुद्धा गैर आहे, असे असताना तुम्ही एका स्त्रीला हातावर चक्क उचलून नदी पार कशी केली? असा प्रश्न शिष्य साधूला करतो. यावर ‘मी त्या स्त्रीला नदीच्या पलीकडे सोडले सु्ध्द्धा आणि तू अजूनही तिचा भार उचलून आहेस?’, असा प्रतिप्रश्न साधू शिष्याला करतो. यावर शिष्य निरूत्तर होतो. ही कथा लिहित टेरेंसने एकप्रकारे उत्तर दिले आहे.

नोरा म्हणाली, थँक्स

टेरेंसच्या या पोस्टवर नोरानेही कमेंट केली आहे. नोराने लिहिले, ‘धन्यवाद टेरेंस. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोसोबत सर्रास छेडछाड होत असताना तू विचलित झाला नाही, हे बघून आनंद वाटला. हा काळही निघून जाईल. या शोमध्ये तू आणि गीता मांने मला खूप आदर व प्रेम दिले. माझ्यासाठी हा एक मोठा अनुभव आहे,’ असे नोराने लिहिले.शोमध्ये नोरा मलायका अरोराच्या जागी जज म्हणून आली आहे. आधी नोराला दोन एपिसोड जज करण्यासाठी साईन केले गेले होते. मात्र मलायकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचा करार आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला.

काय आहे व्हिडीओतसोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ 12 सप्टेंबरला चॅनलवर प्रसारित झालेल्या एपिसोडचा असल्याचे मानले जात आहे. यात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा गेस्ट म्हणून आले होते. शोमध्ये तिन्ही जज गीता कपूर, नोरा व टेरेंस हे शत्रुघ्न व पूनम यांचे अनोखे स्वागत करतात. व्हिडीओत दिसते त्यानुसार, याचदरम्यान टेरेंसने नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करतो. नोरा यावर काहीही रिअ‍ॅक्ट करत नाही.

नेटक-यांनी घेतला टेरेंसचा क्लास नोरा व टेरेंसच्या या व्हिडीओवर नेटक-यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती टेरेंस, असे एका युजरने लिहिले आहे. अर्थात काही जणांनी टेरेंसचे समर्थनही केले आहे. कदाचित नोराला खाली वाकण्यासाठी इशारा देताना असे केले असावे, असे काहींनी म्हटले आहे. काहींनी मात्र यानिमित्ताने टेरेंसवर सडकून टीका केली आहे. ‘आधी मला वाटले, चुकून टेरेंसचा हात लागला असावा. पण चुकून कोणाला हात लागला तर आपण माफी मागतो. पण असे काहीही झाले नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. अन्य एका युजरने व्हिडीओकडे लक्ष वेधले आहे. ‘प्रमाण करताना दोन्ही हात एकत्र मुव्ह करतात. हात सरळ यायला हवेत. पण टेरेन्सचा हात मागे का गेला?’ असा सवाल एका युजरने केला आहे.

टॅग्स :नोरा फतेही