Join us

सावळा रंग म्हणजे दुप्पट हुंडा... रणदीप - इलियानाच्या 'तेरा का होगा लव्हली'चा ट्रेलर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:14 IST

गंभीर समस्येवर भाष्य करणाऱ्या 'तेरा क्या होगा लव्हली' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय

रणदीप हुडाच्या 'वीर सावरकर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. त्याआधी रणदीपच्या आगामी 'तेरा क्या होगा लव्हली' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय.  रणदीप आणि इलियाना डीक्रूझ सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. लग्नाळू मुलींना सावळ्या वर्णामुळे मिळणारी दुय्यम वागणूक, अशा गंभीर समस्येवर हा सिनेमा भाष्य करतो. विशेषतः गंभीर समस्येवर सिनेमात विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलंय.

'तेरा क्या होगा लव्हली' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हरियाणातली कथा दिसते. सावळ्या वर्णाची इलियाना अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न करण्यासाठी उत्सुक असते. ती लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत असते. पण मुलं तिच्या वर्णामुळे तिला नाकारतात. किंवा दुप्पट हुंड्याची मागणी करतात. शेवटी लग्नाचा नाद सोडून इलियाना शिक्षणावर लक्ष केंद्रीत करते. पुढे तिच्या आयुष्यात रणदीप हूडाची एन्ट्री होते. रणदीप तिच्या प्रेमात पडताना दिसतो. आता संपूर्ण कथा सिनेमा पाहूनच कळेल.

'तेरा क्या होगा लव्हली' सिनेमात इलियाना, रणदीप हूडा प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय करण कुंद्रा, गीता अग्रवाल, पवन मल्होत्रा हे कलाकार सुद्धा सिनेमात झळकत आहेत. महिला दिनाच्या मुहुर्तावर ८ मार्चला 'तेरा क्या होगा लव्हली' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक महिन्यांनी आणि विशेषतः आई झाल्यावर या सिनेमाच्या माध्यमातून इलियानाला मोठ्या पडद्यावर बघण्यास सर्व उत्सुक आहेत.

 

टॅग्स :रणदीप हुडाइलियाना डीक्रूज