Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तेनाली रामा'ने पूर्ण केले ४०० एपिसोड्स टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 16:03 IST

'तेनाली रामा'ने यशस्‍वीरित्‍या ४०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण केला आहे. रामाची (कृष्‍णा भारद्वाज) कुशाग्र व तल्‍लख बुद्धी आणि तथचार्यच्‍या (पंकज बेरी) हास्‍यस्‍पद दुष्‍ट हेतूंसह प्रेक्षकांना प्रभावित केलेली मालिका प्रेक्षकांमध्‍ये खूपच लोकप्रिय ठरली आहे.

ठळक मुद्देमालिकेच्‍या पात्रांनी अगदी लहान मुलांपासून प्रौढ व्‍यक्‍तींपर्यंत प्रेक्षकांच्‍या मनात घर केले आहे

सोनी सबवरील ऐतिहासिक विनोदी मालिका 'तेनाली रामा'ने यशस्‍वीरित्‍या ४०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण केला आहे. रामाची (कृष्‍णा भारद्वाज) कुशाग्र व तल्‍लख बुद्धी आणि तथचार्यच्‍या (पंकज बेरी) हास्‍यस्‍पद दुष्‍ट हेतूंसह प्रेक्षकांना प्रभावित केलेली मालिका प्रेक्षकांमध्‍ये खूपच लोकप्रिय ठरली आहे. मालिकेच्‍या पात्रांनी अगदी लहान मुलांपासून प्रौढ व्‍यक्‍तींपर्यंत प्रेक्षकांच्‍या मनात घर केले आहे.

तेनाली रामाच्‍या टीमने अगदी उत्‍साहात हा आनंदमय क्षण साजरा केला आणि प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा व प्रेमासाठी त्‍यांचे आभार मानले. रामाची प्रमुख भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला, ''आमच्‍या प्रेमळ प्रेक्षकांमुळेच आमच्‍या मालिकेला भव्‍य यश मिळाले आहे. त्‍यांनी दिलेल्‍या पाठिंब्‍यामधून आम्‍हाला दररोज अथक मेहनत घेण्‍याची प्रेरणा मिळते. अशा प्रतिभावान व मजेशीर टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव अद्वितीय राहिला आहे. आम्‍ही अशा अनेक सुवर्ण टप्‍प्‍यांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याची आशा करतो.''

आगामी आठवड्यांमध्‍ये रामा गुंडाप्‍पाच्‍या अभ्‍यासासाठी कृष्‍णदेवरायाला विजयनगरमध्‍ये एक नवीन गुरूकुल बांधण्‍याची विनवणी करताना दिसणार आहे. राजा ते मान्‍य करतो, पण तथाचार्य त्‍यामध्‍ये बाधा आणण्‍याचा प्रयत्‍न करतो. तथाचार्य गुंडाप्‍पाला गुरूकुलमध्‍ये प्रवेश मिळू नये म्‍हणून त्‍याच्‍यासमोर गुणवंत राजपूतांसाठी असलेली अवघड प्रवेश परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍याचे आव्‍हान ठेवतो. पण राजा त्‍याच्‍या क्षमतेची परीक्षा घेण्‍यासाठी त्‍याच्‍यासमोर दुसरी चाचणी ठेवतो. रामा या सर्व अवघड स्थितींमध्‍ये त्‍याच्‍या मित्राला अभ्‍यासाची इच्‍छा जागृत ठेवण्‍यास प्रेरित करण्‍यामध्‍ये कशाप्रकारे यशस्‍वी होईल?

टॅग्स :तेनाली रामा