Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! तुमच्या भेटीला येतेय आणखी एक नवी मालिका; पहा Promo

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:13 IST

माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजिंद, ती परत आलीये या तीन मालिकांसोबत ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही नवी कोरी मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

ठळक मुद्दे अमृता पवार ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत तिने काम केले आहे.

कोरोनाचा काळात छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिका रखडल्या. पण आता हळूहळू मनोरंजन विश्वाची गाडी रूळावर येतेय. अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. झी मराठी वाहिनीवर तर अनेक नव्या मालिकांची रेलचेल दिसणार आहे. अनेक नवीन मालिकांच्या प्रोमोंनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातलीच एक मालिका म्हणजे, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही लवकरच येऊ घातलेली मराठी मालिका.माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजिंद, ती परत आलीये या तीन मालिका लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’  (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava ) ही नवी कोरी मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

 येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता  ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. मालिकेचा प्रोमो रिलीज झालाये आणि  तो बघता प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

तूर्तास मालिकेत अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेतील अन्य कलाकारांची नावं सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. पण प्रोमो बघता, ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार, असं दिसतंय. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारित होणार असल्यानं या वेळेवर प्रसारित होणारी ‘माझा होशील’ ना प्रेक्षकांचा निरोप घेणार का?  असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेलच. पण अद्याप तेही गुलदस्त्यात आहे. अमृता पवार ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत तिने काम केले आहे. अमृताने ‘दुहेरी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होते. त्यानंतर ती ‘ललित 205’ या मालिकेत झळकली होती

टॅग्स :झी मराठी