झी मराठी (Zee Marathi ) या वाहिनीवर गेल्या काही दिवसांत एकापेक्षा एक वेगवेगळ्या विषयावरच्या मालिका सुरू झाल्यात. प्रेक्षकांना रिझवून ठेवण्यासाठीचा वाहिनीचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. नव्या मालिकांपैकी अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्या आहेत. ‘नवा गडी, नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya ) ही अशीच एक मालिका. मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. आनंदी आणि राघवची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. पण तूर्तास मालिकेचं कथानक पाहून चाहते निराश आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर आनंदी राघव एकत्र येणार आहेत आणि रमाचा या दोघांना वेगळं करण्याचा डाव फसणार आहे. आनंदी व राघव एकत्र येऊ नये, म्हणून रमा नको नको ते खटाटोप करते. प्रेक्षकांना हे काही केल्या पचनी पडत नाहीये. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. 'भुताचे पण काही limitations दाखवाल की नाही???पत्र काय लिहते...डोळ्याने आग काय विझवते .? रिक्षा काय चालवते ??पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान comedy level var तरी ठेवा ....लेखक कन्फ्युज दिसतोय...', अशी कमेंट एका युजरने केली आहे. 'रमाला कायमचा मोक्ष द्या आणि आमची सुटका करा. ती गोड आनंदी बघायला किती छान वाटतं.पण ही बया आली की टीव्हीवर काही तरी फेकून मारावं असं वाटतं,' असं अन्य एका युजरने लिहिलं आहे. 'खूप कंटाळवाणी सुरु आहे मालिका' अशा कमेंटही बघायला मिळत आहेत.