Join us
Daily Top 2Weekly Top 5

हीच का आपली ‘देवमाणूस’मधील वंदी आत्या?  खऱ्या आयुष्यातील तिचे फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 18:28 IST

Devmanus serial : वंदी आत्या या मालिकेतील पात्राने सध्या अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. याच वंदी आत्याला खऱ्या आयुष्यात पाहाल तर थक्क व्हाल.

ठळक मुद्देचांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणा-या वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या जाम चर्चेत आहेत. मालिकेतील पात्रांचीही जबरदस्त चर्चा आहे.  अजित कुमार, रेश्मा, डिंपल, टोण्या, बज्या, वंदी आत्या अशी सगळीचं पात्र सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली आहेत. आज या मालिकेतील अशाच एका पात्राबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोण तर वंदी आत्या. (Zee Marathi Devmanus serial)

होय, हावरट आणि भांडखोर वंदी आत्या या मालिकेतील पात्राने सध्या अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. याच वंदी आत्याला खऱ्या आयुष्यात पाहाल तर थक्क व्हाल. होय, हीच ती वंदी आत्या हे तुम्ही ओळखूही शकणार नाही. मालिकेत अगदीच गावराण दिसणारी वंदी आत्या खऱ्या आयुष्यात चांगलीच मॉर्डन आहे.

वंदी आत्याची ही भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी जिवंत केली आहे. पुष्पा चौधरी या एक उत्तम अभिनेत्री, गायिका व मॉडेल आहेत.  ‘बाबो’ या सिनेमात त्या झळकल्या होत्या. गायनाचीही त्यांना आवड आहे. सोशल मीडियावर गायनाचे अनेक व्हिडीओ त्या शेअर करत असतात.

पुष्पा यांनी काही सौंदर्यस्पर्धाही जिंकल्या आहेत. 2020 मध्ये मिसेस कॉन्फिडन्स हा किताब त्यांनी पटकावला होता. तर यावर्षी सुपरवुमन या किताबावर नाव कोरले होते.  सोशल मीडियावर पुष्पा चौधरी कमालीच्या सक्रिय आहेत.

 

चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणा-या वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत  किरण गायकवाड  याने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिकली आहेत. या मालिकेत आलेल्या विलक्षण वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. 

टॅग्स :झी मराठी