Join us

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येतंय, टीझर प्रदर्शित, कोण बनणार कॉमेडीचा नवा डॉन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:10 IST

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येतंय, हास्याची मेजवानी लवकरच सुरू होणार!

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय मराठी शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yevu Dya ).  या शोमधील पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतात. हा शो बंद झाल्यानंतर चाहते कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. आता 'चला हवा येऊ द्या' च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा लोकप्रिय शो पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'झी मराठी' वाहिनीने 'चला हवा येऊ द्या' शोचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये '१० वर्ष, ११३७ एपिसोड्स आणि ९ सीझननंतर कॉमेडीचं वादळ पुन्हा येतंय.." असं म्हटलंय. टीझरमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. टीझर प्रदर्शित होताच 'चला हवा येऊ द्या'चे चाहते मात्र प्रचंड खूश झाले आहेत.  

कॉमेडीचा नवीन डॉन होण्यासाठी आता ऑडिशन घेतल्या जाणार असल्याचं टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. पण, हे ऑडिशन केव्हा होणार आणि हा शो कधी सुरू होणार याची अधिकृत माहिती वाहिनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. आता या नव्या पर्वात काही नवीन चेहरे देखील दिसतील, असं संकेत आहेत. जुने कलाकारही या पर्वाचा भाग असतील का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. 'चला हवा येऊ द्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज आहे आणि यावेळी हास्याची लाट आणखी मोठी असणार आहे, हे नक्की! 

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठीश्रेया बुगडे