Join us

सूरज चव्हाणनं घेतली निक्की तांबोळीची भेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:33 IST

सुरजनं निक्की आणि तिच्या आई-बाबांची भेट घेतली.

Suraj Chavan Meets Nikki Tamboli: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात दोन स्पर्धकांची सर्वांत जास्त चर्चा झाली होती ते म्हणजे सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli).  सुरजचा साधा स्वभाव प्रेक्षकांना आडला होता. तर अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीचा खेळ आणि तिची संपुर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली होती. ही भावा-बहिणींची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारणही तेवढचं खास आहे. नुकतंच सूरज चव्हाण थेट निक्की तांबोळीच्या घरी पोहचला. सुरजनं निक्की आणि तिच्या आई-बाबांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतला.

नुकताच सूरज निक्की तांबोळीच्या घरी पोहोचला. याचा खास फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये निक्कीनं लिहलं, "वेलकम होम सूरज चव्हाण… 'झापुक झुपूक' सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होतोय…सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा". निक्कीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई-बाबाही दिसून आले. तर सुरजनेही निक्कीसोबतचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

सुरजनं व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहलं, "काल लई दिवसांनी आमच्या बिग बॉसच्या घरातल्या शेरनीला, माझ्या बहिण निक्की तांबोळीला भेटलो. भेटून लईच खुशी झाली, तिला बी लई आनंद झालता. निक्की सोबत आई, बाबा, लिली अन क्रिस्टीला बी भेटलो, खूप एंजॉय केलं, पोटभर जेवलो... डांस बी केलाय फुल्ल टू खऊन गोलीगत व्हू"  निक्की, आई, बाबा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहुद्या…तुम्हाला खुशी होईल असंच काम करत राहणार. लवकरच परत येतो भेटायला. तुमचाच सूरज", असं त्यानं म्हटलं. 

सूरज चव्हाण सध्या त्याच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा 'झापुक झुपूक' (zapuk zupuk ) चित्रपट २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक'मध्ये सूरजसह इंद्रनील कामत, जुई भागवत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. झापुक झुपूक’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सूरजने वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर या सगळ्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं.  

टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉसमराठी अभिनेता