Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी माझ्या शरीराची वाट लावून घेतली...", कॉमेडीतून ब्रेक घेतल्यानंतर झाकिर खानचा खुलासा, गंभीर आजाराचा करतोय सामना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:15 IST

देशात आणि परदेशात शेड्युल असलेले लाइव्ह शो संपल्यानंतर तब्बल ५ वर्षांसाठी ब्रेक घेणार असल्याचं झाकिर खानने त्याच्याच एका स्टँडअप शोमध्ये सांगितलं. यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागच नेमकं कारण झाकिरने सांगितलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कॉमेडियन असलेल्या झाकिर खानने कामातून ब्रेक घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला होता. देशात आणि परदेशात शेड्युल असलेले लाइव्ह शो संपल्यानंतर तब्बल ५ वर्षांसाठी ब्रेक घेणार असल्याचं झाकिर खानने त्याच्याच एका स्टँडअप शोमध्ये सांगितलं. यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागच नेमकं कारण झाकिरने सांगितलं आहे. 

झाकिरने नुकतीच गल्फ न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं. झाकिर म्हणाला, "मला काही आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातील काही जेनेटिक आहेत. मला माझ्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. माझ्या कुटुंबामध्ये काही जेनेटिक आजार आहेत. एका वयानंतर ते आजार उद्भवू लागतात. याशिवाय मी स्वत: देखील माझ्या शरीराचं खूप नुकसान करून घेतलं आहे. फक्त दोन तास झोप घेतो आणि नंतर हजारो लोकांना भेटायला जातो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या शहरात जाता. त्यानंतर लगेचच लोकांन भेटणं सुरू होतं". 

"माझ्या कुटुंबात एवढं यश कोणालाच मिळालेलं नाही. त्यामुळे माझ्यावर येणाऱ्या पुढील पिढींचीही जबाबदारी आहे. यामुळे मी जवळपास १० वर्ष फक्त कामाला माझी प्रायोरिटी मानत होतो. पण, त्यामुळे माझ्या तब्येतीवर त्याचा गंभीर परिणाम झाला. सुरुवातीला मला वाटलं होतं की कामासोबत मी या गोष्टी सांभाळून घेईन. मात्र जेव्हा मी गेल्या वर्षी अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा मला जाणीव झाली की या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं कठीण आहे. त्यामुळेच मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे", असंही त्याने पुढे सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Zakir Khan reveals health struggles after comedy break, genetic issues?

Web Summary : Comedian Zakir Khan cited health issues, including genetic predispositions and exhaustion from demanding schedules, as reasons for his five-year break. He realized the need to prioritize his well-being after neglecting it for a decade due to work pressures and family responsibilities.
टॅग्स :टिव्ही कलाकार