Zakir Khan On Dhurandhar : 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम मोडत आहे. आदित्य धर दिग्दर्शित सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या १८ दिवसांत १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत इतिहास रचला. या अभूतपूर्व यशावर भाष्य करताना लोकप्रिय कॉमेडियन झाकीर खान याने त्याच्या खास शैलीत बॉलिवूडमध्ये असलेल्या अंतर्गत स्पर्धेवर फिरकी घेतली.
नुकतंच चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. चेतक स्क्रीन अवॉर्ड्सचे होस्ट आलिया भट, सुनील ग्रोव्हर, झाकीर खान आणि सौरभ द्विवेदी होते. या सोहळ्यात झाकीर खानने 'धुरंधर' चित्रपटाच्या यशावर सिनेसृष्टीतील कलाकारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर थेट भाष्य केलं. झाकीर म्हणाला, "तुम्ही कितीही अभिनंदनाच्या पोस्ट टाका किंवा मुलाखतींमध्ये 'धुरंधर' माझा आवडता सिनेमा आहे असं सांगा; पण सत्य हेच आहे की बॉलिवूडमध्ये अनेकांचा या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून जळफळाट होतोय".
पुढे विनोदी शैलीत तो म्हणाला, "बॉम्ब ल्यारीमध्ये फुटला, पण त्याचा धूर वांद्रे ते जुहू पर्यंत पसरला आहे". झाकीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकरी यावर 'झाकीरने सत्यच मांडले', "हे खरं आहे", अशा कमेंट्स करत आहेत. झाकीर खानच्या या विधानामुळे आता बॉलिवूडमधील अंतर्गत स्पर्धेची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
स्पाय थ्रिलरचा जगभरात डंका
'धुरंधर' या चित्रपटाचा पहिला भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने जगभरात १३०० कोटींहून अधिक कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला होता. आता त्याचा सिक्वेल 'धुरंधर: द रिव्हेंज'ने तर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अवघ्या १८ दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा पार केला. तर जगभरात १६०० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंह सोबत अर्जून रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जून यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Comedian Zakir Khan humorously addressed Bollywood's envy towards 'Dhurandhar: The Revenge's' box office success at an awards show, sparking discussions about industry competition. The film, starring Ranveer Singh, has broken records, earning over ₹1000 crore in India alone.
Web Summary : कॉमेडियन ज़ाकिर खान ने एक अवॉर्ड शो में 'धुरंधर: द रिवेंज' की बॉक्स ऑफिस सफलता पर बॉलीवुड की ईर्ष्या को हास्यपूर्ण ढंग से संबोधित किया, जिससे उद्योग में प्रतिस्पर्धा पर चर्चा छिड़ गई। रणवीर सिंह अभिनीत फिल्म ने रिकॉर्ड तोड़ दिए हैं, जिसने अकेले भारत में ₹1000 करोड़ से अधिक की कमाई की है।