Join us

फोटोशूटवेळी मौनी रॉयच्या कैद झालेल्या या अदा बघून तुम्हीही व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 14:15 IST

छोट्या पडद्यावर नागिन बनत अभिनेत्री मौनी रॉयने असाकाही धुमाकुळ घातला की छोट्या प़डद्यावर फक्त तिचीच जादू पाहायला मिळाली.छोटा पडदा ...

छोट्या पडद्यावर नागिन बनत अभिनेत्री मौनी रॉयने असाकाही धुमाकुळ घातला की छोट्या प़डद्यावर फक्त तिचीच जादू पाहायला मिळाली.छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीला सिनेमांचीही लॉटरी लागली. अक्षय कुमारसह गोल्ड सिनेमातून ती लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.सिनेमांमुळे चर्चेत असलेली मौनी आता तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळेही चर्चेत आहे. तिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोत मौनी रॉय व्हाइट कलरच्या शर्टमध्ये टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करतान दिसतेय.त्यासोबत या लूकला आणखी स्टायलिश करण्यासाठी मौनीने स्टॉकिंग्स कॅरी केले,त्यामुळे ती अधिकच ग्लॅमरस दिसते.खुद्द मौनीनेच तिचे  हे काही निवडक फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.मौनीचाहा अंदाज पाहताच तिला तिच्या चाहत्यांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतायेत. नेहमीच मौनी तिच्या लूकला साजेसा स्टायलिश पेहराव करत असते त्यामुळे तिचे सौदर्यांला चार चाँद लागतात. तिला खूप चांगल फॅशन सेन्स असल्याचेही बोलले जाते  त्यामुळे छोट्या पडद्यावर टीव्ही अभिनेत्रींमध्ये निया शर्मासह मौनी रॉयलाही स्टायलिश पर्सनालिटी म्हणून ओळखले जाते.मौनीने केलेले हे फोटोशूट पहिल्यांदाच केले आहे असे नसून आधीही तिने अशाप्रकारेच ग्लॅमरस फोटोशूट केले होते.मौनीने काही महिन्यांपूर्वी ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप परिधान करत हटके फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटमधील अंदाजही तिच्या  चाहत्यांना खूप आवडला होता. तर दुसऱ्या फोटोत मौनीने ब्लॅक डीप नेकचा टॉप आणि लाईन्स वाली पँट घातत हटके पोज देत फोटोशूट करून घेतले होते. चाहत्यांनी दिलेल्या कमेंटस आणि लाईक्समुळेच  क्रॉप टॉप फोटोशूटला अवघ्या दोनच दिवसात 25 लाख 9 हजार 517 लोकांनी लाईक्स केले होते. तर दुसऱ्या फोटोला 22 तासांच्या आत 21 लाख 3 हजार 228 लोकांनी बघून लाईक केल्याचे पाहायला मिळाले होते.गोल्डमध्ये मौनी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.  हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. गोल्ड आणि ब्रह्मस्त्रशिवाय आणखी तिसरा सिनेमा मौनीच्या हाती लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे छोट्या पडद्यावरची ही क्वीन लवकरच रूपेरी पडद्यावरची क्वीन बनणार अशीच चिन्ह दिसतायेत.