Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘भाभी जी घर पर है’ मालिकेतल्या अम्माजी यांनी तरुणीचा फोटो शेअर केला आणि चर्चेत आल्या, वाचा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:30 IST

सोमा राठोड ‘भाभीजी घरपर है’ आणि ‘जीजाजी छत पर है’ या लोकप्रिय मालिकेत झळकत आहेत.त्यांच्या भूमिकेलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत असते.

छोट्या पडद्यावर सध्या विविध विनोदी मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘भाभी जी घर पर है’ सुरुवातीपासूनच मालिकेने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. त्यापैकी एक व्यक्तीरेखा सध्या चर्चेत आहे.

मालिकेतल्या ‘अम्माजी’ सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अम्माजी ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोमा राठोड यांनी. सोमा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचे सेटवरचे काही खास फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहतेही चांगलेच संभ्रमात पडले आहेत. 

सोशल मीडियावर अम्माजी म्हणजेच सोमा राठोड यांनी त्यांच्या तरुणपणातला एक फोटो शेअर केला होता. पूर्वी त्या स्लिम ट्रीम होत्या. त्यामुळे सोमा राठोड यांचा हा फोटो असूच शकत नाही हेच चाहते कमेंटमध्ये बोलताना दिसत होते. पण हा फोटो सोमा राठोड यांचाच होता. वयाच्या २० वर्षी काही तरी काम मिळावे म्हणून त्यांनी हे फोटोशूट केले होते.

 

 

त्यावेळी त्यांचे वजन फक्त  ५२ किलो होते. त्यादरम्यानचा हा फोटो चाहत्यांसह शेअर करत त्यांनी सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. सोमा राठोड  ‘भाभीजी घरपर है’ आणि ‘जीजाजी छत पर है’ या लोकप्रिय मालिकेत झळकत आहेत. त्यांच्या भूमिकेलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत असते. 

टॅग्स :भाभीजी घर पर है