Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जय जय स्वामी समर्थ'मधील स्वामी समर्थांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 07:00 IST

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही मालिका श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यामुळे कमी कालावधीत ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून यात स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मालिकेत अक्षय मुदवाडकरने स्वामींची भूमिका साकारली आहे. 

अक्षय मुदवाडकर मुळचा नाशिकचा आहे. नाशिक ही त्याची जन्म भूमी आणि मुंबई कर्मभूमी आहे. त्याला बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे. त्याने अभिनेता होण्याचे स्वप्न लहानपणी पाहिले आणि मोठेपणी पूर्ण केले.  या मालिकेव्यतिरिक्त त्याने अनेक प्रायोगिक, व्यावसायिक नाटकात काम केली आहेत.

गांधी हत्या आणि मी’,’ द लास्ट व्हॉइसरॉय’ या नाटकात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ही नाटक प्रेक्षकांना खूप भावली.  स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतही त्याने काम केले आहे.अक्षयचे युट्यूब चॅनेल असल्याचे देखील सांगण्यात येते. 

महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवला, त्यांचे मार्गदर्शक बनले. त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

अशाच ब्रह्मांडनायक 'श्री स्वामी समर्थ' ह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला.अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. शिरीष लाटकार लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे.

टॅग्स :कलर्स मराठी