Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही माझे स्वप्न पूर्ण केले...! ‘बिग बॉस 14’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर भावूक झाली रूबीना दिलैक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 10:18 IST

Bigg Boss 14 Winner:  इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत मानले चाहत्यांचे आभार, म्हणाली...

ठळक मुद्देबिग बॉसच्या घरातील प्रवास माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. या प्रवासात मी स्वत:चाच शोध घेतला आणि मला याचा अभिमान आहे, असेही शो जिंकल्यानंतर रूबीना म्हणाली.

बिग बॉस 14 ची ट्रॉफी अखेर रूबीना दिलैकने जिंकली. बिग बॉसच्या घरात 143 दिवस राहणारी रूबीना बिग बॉसची ट्रॉफी आणि 36 लाख प्राईज मनी घेऊनच बाहेर पडली. बिग बॉसची विजेती ठरल्यानंतर रूबीनाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानलेत.काय म्हणाली रूबीना...‘खूप खूप आभार. मी माझ्या सुंदर तिस-या डोळ्यासोबत (बिग बॉसची ट्रॉफी) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतेय. माझ्या फॅन्स आणि फॉलोअर्ससाठी हे इन्स्टंट इन्स्टा लाईव्ह करतेय. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी बिग बॉस 14 ची विजेती बनू शकली. तुम्ही माझे स्वप्न सत्यात बदलले. यानंतर मी खास तुमच्यासाठी लाईव्ह येईल. बिग बॉस, कलर्स टीव्ही आणि सलमान खान यांचेही खूप खूप आभार...,’ असे रूबीना म्हणाली.

डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान...बिग बॉसच्या घरात रूबीनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेलेत, तेव्हा या कपलच्या वैवाहिक आयुष्यात फार काही ठीक नव्हते. अगदी दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यत पोहोचले होते. पण बिग बॉसच्या घरात एकत्र राहताना दोघांमधील मतभेद दूर झालेत. दोघांनाही नव्याने एकमेकांची, एकमेकांवरच्या ्रप्रेमाची जाणीव झाली. रूबीना व अभिनवने  घटस्फोटाचा विचार कधीच मनातून काढून टाकला आहे. आता तर दोघेही दुसºयांदा लग्न करण्याच्या विचारात आहेत. यासाठी रूबीना डेस्टिनेशन वेडिंग प्लान करतेय. आमचे हे दुसरे लग्न आयुष्यभरासाठी असेन, असे रूबीना बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हणाली. या शोने आमचे नाते मजबूत केले. आम्ही बिग बॉसच्या घरात नव्याने प्रेमात पडलो, असेही ती म्हणाली.

सर्व नशीबाचा खेळ...बिग बॉस जिंकणे माझे स्वप्न होते. मला हा शो जिंकायचाच होता. म्हणतात ना, सगळा नशीबाचा खेळ असतो. कदाचित हे माझ्या नशीबात होते. बिग बॉसच्या घरातील प्रवास माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. या प्रवासात मी स्वत:चाच शोध घेतला आणि मला याचा अभिमान आहे, असेही शो जिंकल्यानंतर रूबीना म्हणाली.

टॅग्स :बिग बॉस १४