Join us

​तू आशिकीतील रित्विक अरोरा या गोष्टीमुळे आहे सध्या व्यग्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:47 IST

कलर्सच्या तू आशिकीतील रित्विक अरोराने त्याच्या देखण्या आणि चैतन्यदायी व्यक्तिमत्वाने आहान म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो या मालिकेमध्ये ...

कलर्सच्या तू आशिकीतील रित्विक अरोराने त्याच्या देखण्या आणि चैतन्यदायी व्यक्तिमत्वाने आहान म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो या मालिकेमध्ये एका संगीतकाराची भूमिका साकारत आहे आणि वास्तविक जीवनातही तो खूप चांगला गिटार वाजवतो. रित्विक हा केवळ २० वर्षांचा असून तो सध्या बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. त्याची परीक्षा आता जवळ आल्याने चित्रीकरणाचे वेळापत्रक आणि अभ्यास यांच्यात समतोल साधण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रित्विक परीक्षेची तयारी करण्यासाठी सेटवर ब्रेकच्या दरम्यान अभ्यास करताना दिसतो. तो त्याच्या व्यग्र कामाच्या वेळापत्रकाचा त्याच्या अभ्यासावर अजिबात परिणाम होऊ देत नाही. त्याला त्याच्या परीक्षेसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते, त्यामुळे तो त्या दोन्हीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. याविषयी रित्विक सांगतो, मागील आठवडा नेहमीपेक्षा खूपच हेक्टिक होता. मला महासंगम एपिसोडच्या ४० मिनिटांच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला चार वेळा जावे लागले आणि त्याच बरोबर मला माझ्या परीक्षेचा प्रचंड अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण करायचा होता. वाळवंटात प्रवासी पाणी शोधतात तसा मी झोपेचा शोध घेत होतो. तरी सुद्धा मी हे सगळे एन्जॉय करत आहे. तू आशिकी मध्ये पंक्ती शर्मा म्हणजेच जन्नत झुबेर रहमानी आणि आहान धनराजगीर म्हणजेच रित्विक अरोरा यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पंक्तीची आई अनिता शर्मा म्हणजेच गौरी प्रधान ही एक अपयशी अभिनेत्री आहे आणि त्यामुळे तिच्याकडे ऐशोआरामात राहाण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तिने तिच्या स्वतःच्या मुलीला म्हणजेच पंक्तीला दुष्ट अशा जयंत धनराजगीर ऊर्फ जे.डी. म्हणजेच राहिल आझम या लबाड श्रीमंत माणसाला विकलेले आहे. तो पंक्तीला प्रचंड त्रास देतो. पण ही परिस्थिती आहानला कळल्यानंतर तो पंक्तीच्या पाठिशी उभा राहातो आणि तिला या परिस्थितून बाहेर काढण्याचे ठरवतो. त्यामुळे आता तू आशिकी या मालिकेच्या आगामी भागात जेडी एका स्ट्रीप पार्टीत आहानला जबरदस्तीने परफॉर्म करायला लावताना दिसणार आहे. जेडी आहानच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ काढणार आहे आणि तो पंक्तीला पाठवणार आहे. तो पाहून धक्का बसलेली पंक्ती या मागचे कारण शोधण्याचे ठरवणार आहे. यामुळे पंक्ती आणि आहानच्या दरम्यान मतभेद निर्माण होतात की जेडीची योजना सगळ्यांसमोर उघड होईल हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.