झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायलामधील स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत स्वीटू आणि ओम शिवाय इतर पात्रांनी देखील रसिकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान या मालिकेत स्वीटूच्या सासऱ्यांची भूमिका अभिनेते मिलिंद जोशी यांनी साकारली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, मिलिंद जोशी यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. त्यांच्या पत्नीचं नाव अल्पा जोशी आहे.
अभिनेत्री अल्पा जोशी यांनी हिंदी मालिकेत विविध भूमिका केल्या आहेत. हिंदी मालिकेतील सासू, आई, काकी, भाभी अशा सोज्वळ तर कधी दुधात मीठाचा खडा टाकणारया खलनायिकेची व्यक्तीरेखाही अल्पा यांनी साकारल्या आहेत. मराठी, हिंदी व गुजराती सिनेमा, नाटक व मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.